मुंबई: जीप इंडिया कंपनीने भारतातील आपली पहिली एसयूव्ही Jeep Compass ही शानदार कार लॉन्च केली आहे. या कारची खासियत म्हणजे ही कार पूर्णपणे भारतात तयार करण्यात आली आहे. आज याच्या किंमतीची घोषणा झाली आहे. या कारची सुरुवातीची किंमत 14.95 लाख रुपये आहे, तर कारचं टॉप मॉडेल 20.65 लाख रुपयाला उपलब्ध असेल. येत्या दिवाळीपासून या कारची डिलिव्हरी सुरू होणार आहे.

Jeep Compass ही आलिशान कार पाच रंगांमध्ये उपलब्ध असेल. यामध्ये मिनिमल ग्रे, एग्झॉटिक रेड, व्होकल व्हाईट, हायड्रो ब्लू आणि ब्रिलियंट ब्लॅकचा समावेश आहे. Jeep Compass मल्टीएअर पेट्रोलच्या तीन व्हेरियंट आणि 7 मल्टीएअर ऑप्शनमध्ये उपलब्ध असेल. यामध्ये स्पोर्ट, लॉन्गिट्यूड, लॉन्गिट्यूड ऑप्शन, लिमिटेड, लिमिटेड ऑप्शन, लिमिटेड 4X4 आणि लिमिटेड ऑप्शन 4X4 ऑप्शनचा समावेश आहे.

Jeep Compass Unveiled in India
Jeep Compass Unveiled in India

Jeep Compass च्या एक व्हेरियंटमध्ये 1.4 लीटर पेट्रोलचे 4 इंजिन देण्यात आलं आहे, जे 160 हॉर्स पॉवर निर्माण करतं. दुसरं इंजिन 2.0 लीटर डीझेलचं आहे, जे 173 हॉर्स पॉवर निर्माण करतं. यात 6 स्पीड मॅन्यूअल ट्रान्समिशन आहे. पेट्रोल व्हेरियंटसाठी 7 स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्सचा ऑप्शनही आहे.

2017-Jeep-Compass-Gallery-Latitude-Eco-Green-Pearl.jpg.image.1440

कंपनीने दावा केलाय की, या कारमध्ये सुरक्षेच्या दॄष्टीकोनातून अनेक फिचर्स दिले आहेत. यामध्ये 50 पेक्षा जास्त सेफ्टी आणि सिक्युरिटी फीचर्स देण्यात आले आहेत. या फीचर्समध्ये एबीएस, हिल स्टार्ट अॅसिस्ट, अॅडेप्टिव्ह ब्रेक लाईट, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि पॅनिक ब्रेक असिस्ट यांसारखे अत्याधुनिक सिस्टमचा समावेश आहे. खास गोष्ट म्हणजे यामध्ये सहा एअरबॅग देण्यात आले आहेत.

2017 Jeep Compass SUV

Jeep Compass मध्ये 16 इंचाची स्टील अॅलॉय व्हील्स आहे, तर याच्या टॉप मॉडेलमध्ये 17 इंचाची अॅलॉय व्हील्स आहेत. याचा ग्राऊंड क्लिअरन्स 178mm आहे. म्हणजेच ही कार ऑफ रोड सहजरित्या चालवता येऊ शकते.