जिनेव्हा: इथं सध्या ऑटो शो २0१७ सुरू आहे. यात लग्झरी कार मेकर रोल्स रॉईसनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या कारचं वैशिष्ट्य म्हणजे इतर कारला सजावटी साठी पेंटनं रंगवल्या आहेत. तर या कारला हि-याच्या रंग देण्यात आला आहे. या साठी तब्बल १ हजार अस्सल हिर्‍याच्या चुर्‍याने पेंट केले गेले आहे. या कारची किंमत सहा कोटी रुपये सांगितली जात असून त्यात पेंटच्या खर्चाचा समावेश नाही असेही समजते.

ही कार कंपनीने ग्राहकाच्या खास मागणीनुसार तयार केली आहे. या ग्राहकाचे नांव जाहीर केले गेलेले नाही. हिरा हा मुळातच सर्वात कठिण धातू मानला जातो. त्यामुळे हिर्‍याचे बारीक चूर्ण करून त्यातून कार पेंट करणे हेच आव्हान होते. कंपनीने त्यासाठी दोन महिने अथक पर्शिम करून हे आव्हान पेलले.

हिर्‍याच्या चुर्णाचे पेंटींग झाले तरी कारचा सरफेस गुळगुळीत रहावा यासाठी हँड पॉलिश केले गेले व त्यात लाखेचा पातळ थर त्यावर दिला गेला, असेही सांगितले जात आहे. ही कार सध्या ऑटो शो मध्ये सर्वांच्याच आकर्षणाचं केंद्र बनली आहे.