नवी दिल्ली: विस्तारा, स्पाईसजेट आणि इंडिगोनंतर आता एअर इंडियाने आपली मॉन्सून स्पेशल ऑफर जाहीर केली आहे. मॉन्सून स्पेशल ऑफरनुसार एअर इंडियाच्या तिकीटांचे दर 706 रूपयांपासून आहेत. या ‘श्रावण स्पेशल’ सेल अंतर्गत तुम्हाला 17 जून ते 21 जून दरम्यान फ्लाईट तिकीट बूक करावी लागेल. ही ऑफर 1 जुलै ते 20 सप्टेंबर दरम्यान प्रवास करणा-यांसाठीच आहे.

एअर इंडियाने त्यांच्या ट्विटर हॅन्डलवर आणि वेबसाईटवर याची माहिती दिली आहे. मान्सून सेलच्या बाबतीत एअर इंडिया इतर कंपन्यांना जोरदार टक्कर देत आहे. या ऑफरचे तिकीट तुम्ही एअर इंडिया बुकींग ऑफिस, वेबसाईट, अ‍ॅप आणि अधिकृत ट्रॅव्हल एजंटकडून बुक करू शकता. ही ऑफर डोमेस्टिक नेटवर्कच्या काही मोजक्याच सेक्स्टरसाठी आहे.

एअर इंडियाआधी स्पाईसजेटने ‘स्पाईसी समर सेल’ची घोषणा केली आहे. ज्यात विमानाचं तिकीट 799 रूपयांपासून आहे. इंडिगोनेही काही ठराविक भागांसाठी 899 रूपयांचं तिकीट देत आहे. गोएअरची ऑफरही 899 रूपयांपासून सुरू होत आहे. (हे पण वाचा: विमानाने देशात कुठेही फिरा केवळ 899 रूपयांत, इंडिगोची मान्सून स्पेशल ऑफर!)

मान्सूनमध्ये फिरायला जाणा-यांची संख्या मोठी असते याचा विचार करून देशातील विविध विमान कंपन्या या ऑफर्स देत आहेत. देशातल्या देशात फिरायला जाणा-यांसाठी या ऑफर्स फायदेशीर ठरू शकतात.