नवी दिल्ली: कोणत्याही अडचणीशिवाय देशात जीएसटी लागू झाल्यावर भारतीय अर्थव्यवस्थेत विशेषत: विदेशी गुंतवणुकीत सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. विदेशी पोर्टफोलियो असलेल्या गुतवणुकदारांनी (एफपीआय) या महिन्यातील पहिल्या दोन आठवड्यांमध्ये भारतीय बाजारपेठेमद्ये सुमार 11,000 कोटी रूपयांची गुंतवणुक केल्याचे पूढे आले आहे. ही गुंतवणुक गेल्या पाच महिन्यांमध्ये (फेब्रुवारी ते जून) अनेक कारणांमुळे शुद्ध विदेशी गुंतवणुकीनंतर आली आहे. त्यापूर्वी जानेवारी महिन्यात विदेशी गुंतवणुकदारांनी भारतीय 3,496 रूपयांची गुंतवणुक काढून घेतली होती.

5 नान्स डॉट कॉमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश रोहिरा यांच्या हवाल्याने एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तात भारतीय भांडवली बाजारात एफपीआयचे आर्षन वाढले असून, अर्थव्यवस्थेत तेजी येत असल्याचे म्हटले आहे. याशीवाय कोणत्यीही अडचणीशिवाय देशात जीएसटी लागू झाल्यामुलेही गुंतवणुकदार खूश आहेत.(हे पण वाचा: ‘आयकर सेतू’ अॅपचा करा वापर, आणखीन सोप्या पद्धतीने भरा कर)

दरम्यान, जगभरातील एकुण अर्थव्यवस्थेवर नजर टाकता येता काळ हा विकसनशिल देशांसाठी प्रचंड उर्जादाई असून, या देशांची आर्थिक सुधारणा गतीमान होण्यीच चिन्हे असल्याचेही संकेत मिळत आहेत. पण, ही चिन्हे भारतीय भांडवली बाजारासमोर काहीशा अडचणीही निर्माण करू शकतात. कारण एफपीआय आपल्या गुंतवणूकिची दिशा बदलूही शकतात.