नवी दिल्ली: तुम्ही जर इनकम टॅक्स रिटर्न (IRT) करायचा विचार करता आहात तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. लक्षात ठेवा ITR करण्याची अंतीम तारिख 31 जुलै 2017 आहे. जर तुम्ही सुरू आर्थिक वर्ष 1017/18 साठी जर ITR करू इच्छित असाल तर, पूढील गोष्टी जरूर विचारात घ्या. ज्यामुळे ITR दाखल करताना ऐनवेळी काही गडबड होणार नाही.

11 नोव्हेंबर 2016 ते 30 डिसेंबर 2016 या कालावधीत तुम्ही जर कोणत्याही बॅंकेमध्ये 2 लाख रूपये जमा केले असतील तर, त्याबाबतची माहिती तुम्हाला संबंधीत विभागाला द्यावी लागेल. इनकमटॅक्स विभागाने ट्विटरवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. या पोस्टनुसार, जर तुम्ही 50 दिवसांच्या या कालावधीत कोणत्याही एका खात्यात 2 लाख रूपये जमा केले आहेत किंवा वेगवेगळ्या खात्यांमध्ये जमा केलेले मिळून दोन लाख रूपये असतील तर त्याची माहितीसुद्धा तुम्हाला इनकमटॅक्स विभागाला द्यावी लागणार आहे.

दरम्यान, जर तुम्ही प्रतिवर्ष आयकर योग्य कराच्या कक्षेत येत असाल तर, तुम्हाला ITR करावाच लागेल. आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार तुम्हाला 31 जुलै 2017च्या आगोदर ITRचे ई-फायलींग करावे लागणार आहे. ज्या लोकांचा वार्षीत इनतम 5 लाखापेक्षा अधिक आहे किंवा ज्यांनी रिफंड क्लेम केला आहे. तसेच, ज्या लोकांचे वयोमान 80 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे आणि ज्यांनी फॉर्म आईटीआर-1 आणि आईटीआर-2 च्या माध्यमातून रिटर्न फाईल करत आहेत हे लोक या कक्षेत येत नाहीत. (हेही वाचा, आयटी रिटर्न उशिरा भरणे पडणार महागात, भरावा लागणार 10 हजारांचा दंड)

दरम्यान, ई-फायलिंगसाठी तुम्हाला  आयकर विभागाच्या incometaxfiling.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे. इथे तुम्ही IRT केल्यावर तुम्हाला एलेटॉनिक व्हेरिफिकेशन कोड (ईवीसी) निवडावा लागेल. ज्यामुळे तुमची फाईल वॅलीड होईल.