नवी दिल्ली: धमाक्यात लॉन्च करण्यात आलेल्या रिलायंस जिओच्या युजर्ससाठी एक धक्कादायक बातमी आहे. रिलायंस जिओच्या युजर्सना ४ डिसेंबरनंतर ही सर्व्हिस वापरण्यासाठी शुल्क भरावं लागणार आहे. ५ सप्टेंबरला रिलायंस जिओ लॉन्च करण्यात आलं होतं. ही ऑफर ३१ डिसेंबरला संपणार होती. मात्र, आता हा प्लॅन ३ डिसेंबरलाच बंद करण्यात येणार आहे. टेलिकॉम रेग्युलॅटरी अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे ट्रायच्या नियमांनुसार कोणतेही ऑपरेटर ९० दिवसांपेक्षा जास्त वेलकम ऑफर देऊ शकत नाही.

कंपनी काय म्हणते?

रिलायंस जिओ कंपनीचे प्रवक्तांनी सांगितले की, रिलायंस जिओचा वेलकम ऑफर ३ डिसेंबरला बंद होणार आहे. त्यांनी हेही सांगितले की, जे लोक ३ डिसेंबरपर्यंत जिओच्या सर्व्हिसचं सबक्रिप्शन घेतील त्यांना ३१ डिसेंबरपर्यंत मोफत सेवा दिली जाईल. यासोबतच जे लोक ३ डिसेंबरनंतर जिओचं सबक्रिप्शन घेतील त्यांना याचा कमर्शिअल प्लॅन घ्यावा लागेल. ३ डिसेंबरनंअर जिओचं सीम घेणारे युजर्सना नवीन ऑफर आणि आकर्षक प्लॅन उपलब्ध करून दिले जातील.

काय आहे कंपनीच वेलकम ऑफर?

रिलायंस जिओने आपल्या युजर्ससाठी ३ महिन्यांपर्यंत फ्रि अनलिमिटेड इंटरनेट, लॉक्स आणि जिओ अ‍ॅप्सचं फ्रि सबक्रिप्शन दिलं होतं. सोबतच यूजर्सला फ्रि एसएमएसची सुविधाही मोफत देण्यात आली होती.

टेलिकॉम कंपनी रिलायंस जिओ युजर्सला फ्रि इंटरनेट आणि कॉल्स सारखी शानदार सर्व्हिस देत आहे. यादरम्यान ही बातमी येणे सर्वांना हैराण करून सोडणारी आणि धक्कादायक आहे.