व्होडाफोन कंपनीने आयडियासोबत विलिनीकरणाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले आहे, व्होडाफोन इंडिया आणि त्याअंतर्गत येणाऱ्या सर्व्ह मोबाईल कंपनी आता आदित्य बिर्ला ग्रुपच्या आयडिया सेल्यलरमध्ये विलीन होणार आहे. दोन महिन्यांच्या चर्चेनंतर विलिनीकरणावर शिक्कामोर्तब झाले आहे. व्होडाफोनचे विलिनीकरण झाल्याने आदित्य बिर्ला समूहातील आयडिया सेल्युलर ही देशातील सर्वात मोठी मोबाईलधारक ग्राहक असणारी कंपनी बनली आहे.

व्होडाफोन आणि आयडियाच्या विलिनीकरणानंतर चेअरमनपद आयडियाकडे जाईल. तर सीएफओचे पद व्होडाफोनकडे गेले आहे. सीईओ आणि सीओओविषयी संयुक्त बैठकीतच निर्णय घेतला जाईल असे सूत्रांनी सांगितले. नवीन कंपनीमध्ये व्होडाफोनची भागीदारी ४५ टक्के आणि आयडियाची भागीदारी २६ टक्के असणार आहे. पुढे जाऊन आदित्य बिर्ला ग्रूप आणि व्होडाफोनची भागीदारी समान होईल. (345 रूपयांत 28 जीबी 4G आणि कॉल्स फ्री: एअरटेल धमाका)  

उर्वरित ३५ टक्के बाजारातले इतर भागीदार असतील. रिलायंस जिओला टक्कर देण्यासाठी मोबाईल क्षेत्रातल्या या दिग्गज कंपन्या एकवटल्या आहेत. काहीच दिवसांपूर्वी वोडाफोनने आपल्या फोरजी इंटरनेट सेवा आणि कॉलिंगच्या दरात मोठी कपात केली होती. यानंतर या दोन कंपन्यांनी हा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे.

नेमका काय बदल होणार ?
१) नवी कंपनी टेलिकॉम सेक्टरमध्ये देशातली सर्वात मोठी कंपनी होणार आहे. कंपनीचा बाजारहिस्सा ३७ टक्क्यांपर्यंत जाणार असून . एअरटेल दुसऱ्या क्रमांकावर ढकलली जाणार आहे.

२) कंपनीत व्होडाफोनचा हिस्सा ४५.१ टक्के तर आयडियाचा हिस्सा २६ टक्के असणार आहे. कुमारमंगलम् बिर्ला कंपनीचे नवे चेअरमन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

३) नव्या कंपनीचा सीईओ आयडियाचा आणि सीएफओ व्होडाफोनचा असणार आहे. आयडिया आणि व्होडाफोनच्या विलिनीकरणामुळे १ लाख कर्मचारी रोजगाराला मुकण्याची भीती दर्शवली जात आहे. आणि ही सर्वात मोठी चिंतेची बाब आहे.

४) नव्या कंपनीसाठी आयडिया आणि व्होडाफोनच्या सुरू असललेल्या पायभूत सुविधा वापरल्या जाणार असल्याची देखील माहिती मिळाली आहे. या बदलामुळे मोबाईल कंपन्यांमध्ये नव्याने कॉलदर युद्ध सुरू होऊन ग्राहकांना फायदा होणार, की कंपन्या आपापसात तडजोड करून हे युद्धच संपवणार याकडे सर्वांचं लक्ष