नोकिया आणि एचएमडी ग्लोबलने नोकिया 3310 नंतर त्यांचा जुना फिचर फोन नोकिया 105 (2017) आणि नोकिया 130 (2017) ला नव्या अवतारात पुन्हा आणले आहे. हे दोन्ही फोन सिंगल आणि ड्युअल सिम व्हेरिएंटमध्ये लॉन्च झाले आहेत. या दोन्ही फिचर फोनच्या माध्यमातून भारतातील फिचर फोनच्या मार्केटमध्ये पुन्हा एकदा पाय रोवण्याचा उद्देश आहे.

नोकिया 105 ची विक्री 19 जुलैपासून देशभरातील रिटेल स्टोरमध्ये सुरू होईल. या फोनच्या सिंगल सिम व्हेरिएंटची किंमत 999 रूपये आणि ड्युअल सिमची किंमत 1 हजार 149 रूपये आहे. या फोनच्या किंमतीबद्दल एचएमडी ग्लोबलचं म्हणनं आहे की, हा कंपनीचा असा पहिला फोन आहे ज्याची किंमत 1 हजार रूपयांपेक्षा कमी आहे. नोकिया 130 च्या विक्रीबद्दल आणि किंमतीबद्दल अजून माहिती मिळू शकली नाही.

nokia 105 nokia 130
nokia 105 nokia 130

नोकिया 105 च्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचं तर यात मायक्रो यूएसबी 2.0 चार्जिंग पोर्ट, 3.5mm चं ऑडिओ जॅक, 1.8 इंचाचा QVGA कलर डिस्प्ले, 15 तास टॉकटाईम बॅटरी बॅकअप, सापाचा गेम, नोकिया 30+ सॉफ्टवेअर, 4MB रॅम, 4MB स्टोरेज आणि 800mAh ची बॅटरी आहे.

1417533518_500

या फोनबद्दल कंपनीने दावा केलाय की, नोकिया 130 (2017) मध्ये ४४ तासांचा एफएम रेडिओ प्लेबॅक टाईम मिळेल. या फोनमध्ये 1.8 इंचाची QVGA स्क्रीन, ब्लूटूथ सपोर्ट, कॅमेरा, नोकिया 30+ सॉफ्टवेअर, 3.5mm ऑडिओ जॅक, 4 एमबी रॅम आणि 8 एमबी स्टोरेज आहे. नोकिया 105 ब्लू, व्हाईट आणि ब्लॅक रंगांच्या व्हेरिएंटमध्ये मिळणार, तर नोकिया 130 रेड, ग्रे आणि ब्लॅक रंगांमध्ये मिळणार.