रिझर्व्ह बँकेने नागरिकांना आणखी एक दिलासा देणार बाब मांडली आहे. आजपासून जितक्या नव्या नोटा बँकेत भराल, तेवढी रक्कम बँकेतून काढण्यास मर्यादा नसेल. त्यामुळे महिनाअखेरीस सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे समजा तुम्ही बँकेत ३० हजार रुपयांची रक्कम ५०० आणि २०००  रुपयांच्या नव्या नोटांच्या स्वरुपात जमा केली. तर तुम्हाला बँकेतून ३०  हजार रुपयांची रक्कम काढता येईल. इथे तुम्हाला आठवड्याला २४  हजार रुपये काढण्याची अट लागू होणार नाही. (आठवड्याला २४ हजारच काढण्याची मर्यादा शिथील) 

५०० आणि १०००  रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर बँकेतून पैसे काढण्यावर मर्यादा लादण्यात आली होती. मात्र, आता आठवड्याला २४ हजारापेक्षा जास्त रक्कम मोठी रक्कम काढता येईल. तुम्ही जितकी रक्कम बँकेत भराल, तितकीच रक्कम तुम्हाला काढता येईल. ही रक्कम ५०० आणि २००० रुपयांच्या नव्या नोटांच्या स्वरुपात बँकेतून रक्कम मिळेल.

त्याचप्रमाणे आठवड्याला बँक खात्यातून फक्त २४ हजार काढण्याची अट होती. मात्र आता आरबीआयने ही अट शिथील करण्यात आली आहे. म्हणून नागरिकांना या साऱ्या गोष्टींमुळे चांगलाच दिलासा मिळणार आहे.