नवी दिल्ली – नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्यापासून नव-नवे नियम आणि निर्णय घेत असल्याचं पहायला मिळत आहे. आता पून्हा एकदा मोदी सरकार सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचं दिसत आहे. पेट्रोल पंपांवर लागणा-या लांबच लांब रांगा टाळण्यासाठी तेल मंत्रालयाने पेट्रोल, डिझेलची होम डिलिव्हरी करण्याच्या दृष्टीने विचार सुरु केला आहे.

ग्राहकांनी आगाऊ नोंदणी केल्यास पेट्रोलियम पदार्थ घरपोच करण्यात येईल, असे पेट्रोल मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे. देशभरात दररोज किमान 350 कोटी लोक पेट्रोल पंपांवर जात असतात. पेट्रोल पंपावर वर्षभरात किमान 2 हजार 500 कोटींची उलाढाल होत असते.

Fuel

ग्राहकांनी प्री-बूकिंग केल्यास तेल उत्पादनांची होम डिलिव्हरी करण्यासासंबंधी पर्यायांचा विचार सुरु आहे. यामुळे ग्राहकांच्या वेळेची बचत होईल, सोबतच पंपांवर लांगणा-या लांब रांगाही टाळता येतील असे ट्विट तेल मंत्रालयाने केलं आहे. (हे पण पाहा: पेट्रोल पंप बंद ठेवण्याच्या निर्णयाला मोदी सरकारचा विरोध)

आंतरराष्ट्रीय तेल बाजारातील दरानुसार येत्या 1 मे पासून दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये बदल होणार आहे. येत्या 1 मे पासून देशातील निवडक पाच शहरात नियमित पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये बदल होतील. हा प्रयोग यशस्वी झाल्यास संपूर्ण देशभरात हा फॉर्म्युला सुरु होणार आहे. सध्या महिन्याच्या 1 तारखेला आणि 15 तारखेला पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये बदल होत आहे.