आमिर खानच्या दंगल सिनेमाचा ‘गिलहरिया’ हे गाणं नुकतच रिलिज झालं आहे. प्रीतमने या गाण्याला तयार केलं असून अमिताभ भट्टाचार्य हे गाण लिहिलं आहे. आणि जोनिता गांधी यांनी या गाण्याला गायलं आहे.

Dangal song
Gilehriyaan – Dangal

या गाण्याच्या शेवटी आमिर खान आपल्या मुलींच्या करिअरच्या चिंतेत दाखवला आहे. कारण आपल्या तालमित वाढलेल्या मुली आता अॅकॅडमीमध्ये गेल्या आहेत. तिथे त्यांचे कोच वेगळे, त्या मुलींना तिथे मिळणार संगत वेगळी यामुळे आपल्या मुलीचं ध्यैयाकडून लक्ष विचलित तर होणार नाही ना या चिंतेत आपल्याला आमिर खान पाहायला मिळतो.

आता त्या मुली मोठ्या झालेल्या या गाण्यात दिसत आहेत. मुलींनी आपल्या पद्धतीने आयुष्य जगायला सुरूवात केली आहे. मुली बाहेरच्या गोष्टींकडे कशा आकर्षित होत आहे हे या गाण्यात दाखवण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे या सिनेमात मुलींच्या अॅकॅडमीतील कोच म्हणून गिरीश कुलकर्णी आपल्याला पाहायला मिळणार आहे.

या गाण्याला एका वेगळ्या प्रकारात दाखवण्यात आलं आहे. प्रेक्षकांना देखील हे गाणं अधिक पसंद येईल यात काही शंका नाही. तरण आदर्श यांनी देखील हे गाणं ट्विट केलं आहे. या सिनेमात दिग्दर्शक नितेश तिवारी याने पेहलवान महावीर सिंह फोगट यांच्यावर आधारित हा सिनेमा तयार केला आहे. ज्यामध्ये आमिर खान प्रमुख भूमिकेत आहे. हा सिनेमा २३ डिसेंबरला रिलिज होणार आहे.