महाराष्ट्राची पहिली महिला नागरिक असलेल्या अमृता फडणवीस यांनी कायमच स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. पार्श्वगायिका, उच्च बँक अधिकारी, परमेक्ट आई आणि पत्नी अशा अष्टपैलू भूमिका पार पाडत अमृता फडणवीस यांनी आपलं वेगळेपण जपलं आहे. आता त्याच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वातला आणखी एक नवा पैलू समोर आला आहे, त्या लवकरच आपल्या समोर एका ग्लॅमरस अंदाजात दिसणार आहेत. बॉलिवूडचे शहेनशहा अर्थात अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्या लवकरच एका ‘ म्युझिक व्हिडीओ’मध्ये झळकणार आहेत. ‘मुंबई मिरर’ने हे वृत्त दिलं आहे.

दक्षिण मुंबईतील ऑपेरा हाऊसमध्ये या व्हिडीओचं शूटिंग करण्यात आलं. विशेष म्हणजे यावेळी अमृता फडणवीसांचा निराळा अंदाज पाहायला मिळाला. रेड ड्रेस आणि हाय हील्समध्ये अमृता फडणवीस ग्लॅमरस दिसत आहेत. याआधीही अमृता फडणवीस गाण्याच्या माध्यमातून अनेकदा कॅमेऱ्यासमोर झळकल्या आहेत. आताही त्या आपल्या सूरांसोबत अभिनयाची जादूही चाहत्यांना दाखवणार आहेत. मुंबई मिररनेही अमिताभ आणि अमृता यांचा फोटो छापला आहे. तर खुद्द अमिताभ बच्चन यांनी आपण एका सेलिब्रिटीसोबत शूट करत असल्याचं ट्वीट करुन या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

रसिकासांठी पुन्हा खुले झालेले गिरगावमधील ऐतिहासिक ‘ऑपेरा हाऊस’मध्ये  फिर से’ या सुंदर गाण्याच्या व्हिडीओचे शूटिंग नुकतेच पार पडले. विशेष म्हणजे या गाण्याला त्यांनीच स्वरसाज दिला आहे. व्हिडीओमध्ये अमृता अतिशय निराळ्या, मात्र सुंदर आणि ग्लॅमरस अंदाजात दिसल्या आहेत तर बिग बीही काळ्या सूटमध्ये उठून दिसत आहेत. हाय हिल्स आणि लाल रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये त्यांचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसत आहे. प्रसिद्ध कोरिओग्राफर अहमद खानने व्हिडीओसाठी नृत्य दिग्दर्शन केले आहे. खुद्द बिग बींनीही याबाबत ट्विट करत आपण एका सेलिब्रिटीसोबत शूट करत असल्याचे नमूद केले आहे.
Image Credit – Mumbai Mirror