फ्रान्स : फ्रान्समध्ये सुरु असलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूड अभिनेत्रीं आपल्या अनोख्या लूकमुळे चर्चेचा विषय ठरत आहेत. या अगळ्यावेगळ्या लूकची जोरदार चर्चा प्रसिद्धी माध्यमांमध्ये सुरु आहे. दीपिका पदुकोणच्या लुक पाहून सर्वांनी बोटे तोंडात गेल्यानंतर आता ऐश्वर्या रायच्या लूक पाहूनही सर्वजण थक्क झाले आहेत.

ash dp

राजकन्येसारखा निळया रंगाच्या ड्रेसमध्ये ऐश्वर्याचे सौदर्य अधिकच खुलून दिसत होते. रेड कार्पेटवर 43 वर्षीय ऐश्वर्याचा हा लूक टिपण्यासाठी कॅमेरामन्सची एकच धडपड सुरु होती.  (अमिताभ बच्चन ऐवजी ‘ही’ अभिनेत्री करणार ‘कौन बनेगा करोडपती’ शोचे सुत्रसंचालन)

aishwarya01

 

दीपिकाही हॉट अन् सेक्सी

dipika01

कान्सच्या पहिल्या दिवशी दीपिकाचा जलवा पाहण्यासारखा होता. दीपिका वाइन कलरच्या ड्रेसमध्ये रेड कार्पेटवर उतरली अन् सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर तेवढीच हॉट अन् सेक्सी दिसत होती. ड्रेससोबतचा तिचा स्मोकी डार्क मेकअप तिच्या सौंदर्यात भर घालणारा होता. ( तो’ मागून आला, त्याने प्रियांकाला केले किस आणि…)

dipika02ज्वेलरी म्हणाल तर ड्रेसला मॅच इअररिंग्स व बोटात एक अंगठी एवढेच तिने घातले होते. कान्समध्ये संपूर्ण जगाच्या नजरा या सोहळ्याकडे लागलेल्या असतात.

Aishwarya Rai Bachchan at Cannes 2017
Aishwarya Rai Bachchan at Cannes 2017

कान्समधील ऐश्वर्याचे हे 16 वे वर्ष असून लॉरियल या ब्रँडची सदिच्छा दूत असल्याने तिला नेहमी आमंत्रित केले जाते. मागच्यावर्षी तिने ओठांना उठावदार जांभळया रंगाचे लिपस्टिक लावले होते त्यामुळे ती अधिकच चर्चेत आली. खासकरुन टि्वटरवर हा चर्चेचा विषय ठरला होता. त्यावेळी काहींनी तिच्यावर टीकाही केली होती.