मुंबई: मुंबईतील गुन्हे विश्व, गॅंगस्टर यांच्या जीवनावर आधारित सिनेमांची भुरळ बॉलिवूडला नेहमीच पडली आहे. आता पुन्हा एकदा मुंबईतील एका मोठ्या गुन्हेगारावर सिनेमा येऊ घातला आहे. दगडी चाळचा राजा म्हणून ओळखला जाणारा कुख्यात गुंड अरूण गवळी याच्या जीवनावर आधारित ‘डॅडी’ हा सिनेमा येऊ घातला आहे. नुकताच याचा टिझर रिलीज करण्यात आला आहे.

अरूण गवळी हा अतिशय लोकप्रिय असा गुंड आहे. एका खूनाच्या हत्येप्रकरणी तो सध्या तुरूंगात आहे. त्याच्या जीवनावर आधारित हा सिनेमा असणार असून यात अभिनेता अर्जुन रामपाल याने मुख्य भूमिका साकारली आहे. याआधी ‘दगडी चाळ’ हा त्याच्या जीवनावर आधारित सिनेमा मराठीत आला होता. यात मकरंद देशपांडे याने अरूण गवळीची भूमिका साकारली होती.

डॅडीचा टीझर बघण्यासाठी इथे क्लिक करा.

अरूण गवळी या गुंडाचा गुन्हे विश्वातील प्रवास हा अतिशय रोमांचक आहे. गुंड ते लोकप्रतिनीधी असा त्याचा प्रवास कुणालाही थक्क करणारा आहे. अशीम अहलुवालिया याने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. यावेळी अरूण गवळी याच्या गीता आणि योगिता याही उपस्थित होत्या.