आमिर खानने पुन्हा एकदा तो कसा परफेक्शनिस्ट आहे हे सिद्ध केलं आहे. त्याच्या कामाची पद्धतच त्याचं वेगळेपण सिद्ध करत असतं. आमिर खानने दंगल सिनेमासाठी वजन वाढवलं असून तेवढ्याच ताकदीने ते कमी देखील केलं आहे. आमिर खानने हा व्हिडिओ यूटीव्ही मोशन पिक्चरच्या सहाय्याने तयार केला आहे. तो UTV Motion Pictures फेसबुकवर शेअर केला आहे. या व्हिडिओत दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी आमिरने वजन कमी करण्यासाठी कसे प्रयत्न केले आहेत त्याची माहिती दिली आहे.

दंगल हा सिनेमा एक बायोपिक आहे. हरियाणातील पेहलवान महावीर सिंह फोगट यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. सिनेमात आमीर खान महावीर सिंह फोगट यांची भूमिका साकारत आहे. या पेहलवानांना मुलाची अपेक्षा होती जो मुलगा देशाला आणि त्यांना कुस्तीत सुवर्ण पदक जिंकून देईल.

03

या सिनेमाची निर्मिती आमिर खान, किरण राव आणि सिद्धार्थ रॉय कपूरने केली आहे. ज्याचे दिग्दर्शक नितेश तिवारी असून हा सिनेमा २३ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.