ड्रामा क्विन एकता कपूर तिचा आगामी सिनेमा ‘लिपस्टिक अंडर माय बुर्का’ घेऊन येत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा शोमध्ये पोहोचली. आणि या शो दरम्यान तिने सर्वात मोठा खुलासा केला. एकता कपूर तिच्या मालिकांसाठी तर लोकप्रिय आहेच. पण त्याचबरोबर तिच्या मालिकेत साम्य असलेल्या एका गोष्टीसाठी देखील आहे. आणि ती गोष्ट
म्हणजे तिच्या मालिकेतील प्रमुख म्हणा किंवा इतर पात्रांचा होणार अकस्मात मृत्यू. आपण जर उदाहरणार्थ पाहिला गेलो तर एकता कपूरची लोकप्रिय मालिका ‘क्युँकी साँस भी कभी बहु थी’ या मालिकेतील लोकप्रिय पात्र मीहिर याचा मृत्यू प्रचंड चर्चेत होताय त्यामुळे एकता कपूरची ही एक ओळख देखील निर्माण झाली. याचा खुलासा तिने कपिल शर्माच्या शोमध्ये केला आहे.

कपिल शर्माने एकताला ज्योतिषविद्येसंदर्भातील प्रश्न विचारत, “आपल्या आयुष्यात सर्व उलथा-पालथ सरु,” असल्याचं सांगितलं. त्यावर उत्तर देताना एकता म्हणाली की, “जर एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री माझा शो सोडून जाणार असेल, तर सुरुवातीला त्या पात्रासाठी योग्य रिप्लेसमेंट मी शोधत असते. पण जर योग्य रिप्लेसमेंट मिळत नसेल, तर त्या पात्राचा मृत्यू झाल्याचं दाखवते.” एकताने या वक्तव्यातून सुनील ग्रोव्हरवर निशाणा साधल्याची चर्चा आहे.

16 मार्च रोजी कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर ऑस्ट्रेलियातून परतत असताना दोघांच्यातही विमानात टोकाचे वाद झाले होते. यानंतर सुनील ग्रोव्हरने कपिलच्या शोला रामराम ठोकला आहे.