बॉलिवूडमध्ये लव्ह, अफेअर्स आणि गॉसिप हे तर चालतच असतं. सध्या चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता दिग्दर्शक फरहान अख्तर यांच्यातील अफेअरची. सध्या हा विषय जास्त चर्चेत आला आहे आणि त्याला कारणही तसंच आहे. श्रद्धा कपूरने चक्क फरहान खानला आपलं हृदय पाठवलं आहे. काय आहे हा नेमका प्रकार…

श्रद्धा कपूरच्या या नात्यामुळे तिचे वडिल शक्ती कपूर देखील प्रचंड चिडले होते. त्यांनी तिचा हात धरून तिला फरफटत नेल्याची चर्चा देखील रंगली होती. त्यामुळे हे अफेअर सध्या बॉलिवूडमधील हॉट टॉपिक आहे. सध्या दोघांच्या नात्याबद्दल चर्चा आहे. श्रद्धा कपूरचा आगामी सिनेमा ‘हसीना पारकर’चा टिझर लाँच झाला आहे. आणि हा टिझर श्रद्धा कपूरने आपल्या ट्विटर पेजवर शेअर केला आहे. आणि हा टिझर पाहिल्यावर अनेक बॉलिवूड कलाकारांनी कौतुक केलं आहे. त्याचप्रमाणे श्रद्धा कपूरच्या अगदी जवळच्या व्यक्तीने म्हणजे फरहान खानने हा टिझर अतिशय रिअल आणि ड्रामॅटिक असल्याचं म्हटलं आहे. त्याचसोबत हसीना पारकर सिनेमासाठी ऑल द बेस्ट देखील म्हटलं आहे. (हे पण वाचा – SHOCKING! प्रियकर फरहान अख्तरसोबत लिव्ह-इन मध्ये राहणा-या श्रद्धा कपूरला नाराज वडिलांनी फरफटत नेले घरी)


अपूर्व लखियाने दिग्दर्शित केलेल्या सिनेमांत श्रद्धा कपूरने हसीना पारकरसाठी अतिशय मेहनत केली आहे. तिने आपल्या लूक्सवर अधिक मेहनत घेतली असून हसीनाचं जीवन ओळखण्यासाठी ती सर्व जागांवर गेली आहे. हा सिनेमा 14 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.