लॉस एंजलिस: सुपर मॉडेल गिगी हौदीद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘Vogue Paris’ या मासिकासाठी गिगीने हॉट फोटोशुट केले आहे. या फोटोशुटमुळेच ती चर्चेत आली असून, हे फोटोशुट नोव्हेंबरच्या अंकासाठी करण्यात आले आहे. या मासिकासाठी गिगिने काही वेगळ्या एंगलमधून फोटो काढले आहेत. जे, तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत.

या फोटोमध्ये गिगी अत्यंत आकर्ष दिसत असून, तिचे सौंदर्य लक्ष वेधून घेत आहे. गिगिने अशा प्रकारे फोटोशुट करण्याची ही पहिलीच वेळ असली आहे. मात्र, मासिकासाठी फोटोशुट करण्याचीह ही तिची पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अनेक वेळा तिने मासिकासांठी फोटोशुट केले आहे.

काही दिवसांपूर्वी गिगीने ‘W Korea’ नावाच्या मासिकासाठी फोटोशुट केले होते. तिचे हे फोटोशुट डिसेंबरच्या अंकासाठी होते. या मासिकासाठी काढलेले फोटो फोटोग्राफर लियूगी आणि लैंगोने काढले होते. (हेही वाचा, सुंदर रशियन मुलीचा व्हिडिओ व्हायरल)

सुपर मॉडेल गिगी हौदीद
सुपर मॉडेल गिगी हौदीद

आता ताज्या अंकासाठी गिगीन काढलेले फोटोही वेगळ्या अंदाजात आहेत. या फोटोमध्ये गिगी बिकनी फोटोत तर दिसतेच. परंतु, विवीध डिझायनर ड्रेसमधीली गिगीचा अंदाजही पहायला मिळणार आहे.