आपल्या वेगवेगळ्या स्टेटमेंटने नेहमी चर्चेत राहणार वादग्रस्त अभिनेता कमाल खानने यावेळी बीसीसीआयला टार्गेट केले आहे. टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची निवड झाली आहे. दरम्यान त्यांना मिळणारे मानधन बीसीसीआयकडून सात कोटी रुपये मिळणार असतील सीमा रेषेवर लढणाऱ्या जवानांना १० कोटी रुपये एवढा पगार दिला पाहिजे’ असे कमाल रशीद खान याने म्हटले आहे.

रवी शास्त्रींना मिळणार एवढे मानधन ?

अनिल कुंबळेंनतर टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदाची धुरा माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांच्याकडे आहे. त्यांना मिळणारे मानधन हे 7 कोटी असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

याआधीचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) अनिल कुंबळे यांना ९ कोटी रुपये मानधन म्हणून दिले जात होते. तर रवी शास्त्रींना ७ कोटी रुपये दिले जाण्याची शक्यता आहे. कमाल खानला ही गोष्ट खटकली आहे. त्यामुळे त्याने त्याची नाराजी व्यक्त केली आहे.

रवी शास्त्रींना मिळणारी रक्कम ‘अ’ श्रेणीतील खेळाडूला मिळणाऱ्या मानधनाइतकी असेल. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वाचाळवीर अभिनेता आणि स्वयंघोषित समीक्षक कमाल रशीद खान अर्थात केआरकेने बीसीसीआयवर निशाणा साधला आहे.

केआरकेने यामध्ये रवी शास्त्रींना भ्रष्ट म्हटले आहे. तो म्हणतो, रवी शास्त्री सारख्या भ्रष्ट व्यक्तीला बीसीसीआय सात कोटी रुपये मानधन म्हणून देणार असेल तर सीमेवरील जवानांना १० कोटी रुपये पगार दिला पाहिजे असे केआरकेने म्हटलंय.

 कोहलीवरही साधला निशाणा

दरम्याने केआरकेने पुन्हा एकदा कॅप्टन कोहलीवर निशाणा साधला आहे. बीसीसीआयसोबतच केआरकेने विराट कोहलीवरही टीका केली आहे. देशातील जनतेला कोहली कर्णधारपदावर नको आहे असे जनतेच्यावतीने केकेआपच सांगून मोकळा झाला आहे. कोहलीने तात्काळ कर्णधारपदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी केआरकेने केली आहे.

केआरकेने कोहलीवर यापूर्वीही टीका केली आहे. अनिल कुंबळेचा प्रशिक्षकपदाचा राजीनामा आणि त्याजागी रवी शास्त्रींची निवड झाल्यापासून केआरके कोहली आणि शास्त्रींवर टीका करत आहे. रवी शास्त्रींची निवड झाल्यावर केआरकेने एक ट्विट केले होते.

मग शास्त्री खेळाडूंचे केस कापणार का ?

आता कोहली आणि शास्त्री उघडपणे सामन्याच्या निकालावर प्रभाव टाकू शकतील. द्रविड आणि झहीर खान फलंदाजी आणि गोलंदाजीचे प्रशिक्षण देणार असतील तर शास्त्री खेळाडूंचे केस कापणार का ? असा टोलाही त्याने लगावला होता.