‘खुलता कळी खुलेना’ फेम अभिनेत्री मयुरी देशमुख हिने करिअरच्या सुरुवातीलाच लग्न करुन चाहत्यांना धक्का दिला. मयुरी ही अल्पावधीत चाहत्यांच्या मनात घर करून राहत होती. ‘खुलता कळी ही खुलेना’ या मालिकेतील तिचं काम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आणि ती महाराष्ट्रातील घराघरात पोहचली. फारशी ओळखीची नसलेली मयुरी याआधी एका सिनेमात दिसली होती. मयुरीने काही नाटकांमध्येही कामे केली आहेत. मात्र, मयुरीला ओळख मिळाली ती या मालिकेमुळे.

unnamed (2)

मयुरी देशमुख हे नावं काही महिन्यांपूर्वी फारसं कुणाला माहिती नव्हतं. या मालिकेमुळे ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. मयुरी ही मुळची मुंबईची असली तरी विशाखापट्टनम येथे ती वाढली आहे. येथील ॠषी विद्यालया गुरूकुलममधून तिचे सुरूवातीचे शिक्षण झाले. शाळेच्या दिवसात ती नेहमीच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात भाग घ्यायची. तिची हीच आवड तिला अभिनयाच्या करिअरकडे घेऊन आली. प्रायमरी शिक्षण पूर्ण झाल्यावर मयुरी अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्समध्ये शिकण्यासाठी थेट मुंबईत दाखल झाली. (बघा: मयुरी आणि आशुतोषच्या लग्नाचा व्हिडिओ)

Wedding-Image

इथे अभिनयाचे रितसर धडे गिरवल्यानंतर पासआऊट झाल्यावर काही वेळातच तिला टिव्ही मालिकातील रोल मिळाला. यासोबतच ती ‘प्रकाश बाबा आमटे’ या सिनेमातही दिसली. या सिनेमात ती एका पत्रकाराच्या छोट्या भूमिकेत दिसली. नाटक करत असतानाच तिला पुन्हा तिला एक मालिका मिळाली. आता या मालिकेने तिला मोठी लोकप्रियता मिळवून दिली आहे. नुकतेच मयुरी देशमुखने तिच्या याच क्षेत्रात असलेल्या अभिनेता, निर्माता आशुतोष भाकरे याच्यासोबत विवाह केला आहे. (बघा: खुलता कळी खुलेनाची मयुरी अडकली लग्नबंधनात)

 995372_10153398242526669_64993954516154861_n

नाव: मयुरी देशमुख
वय: २३ वर्षे
उंची: ५.५