झी मराठीवरील लोकप्रिय मालिका खुलता कळी खुलेनामधील लोकप्रिय व्यक्ती मानसी म्हणजे आपल्या मयुरी देशमुखचा लग्न सोहळा पार पडला. मयुरी देशमुखने तिच्या याच क्षेत्रात असलेल्या अभिनेता, निर्माता आशुतोष भाकरे याच्यासोबत विवाह केला आहे. सध्या मयुरीच्या लग्नाचे फोटो हे प्रेक्षकांसाठी सुखद धक्का आहे. मयुरी आणि अभिषेकच्या लग्नाचा व्हिडिओ टिझर India.com च्या हाती लागला आहे. Dream Catchers co. ने हा व्हिडिओ तयार केलेला आहे. (खुलता कळी खुलेनाची मयुरी अडकली लग्नबंधनात)

मयुरीचा जन्म २९ ऑक्टोबर १९९२ साली झाला. वयाच्या २३ व्या वर्षी मयुरी विवाहबंधनात अडकली. या मालिकेतून मयुरीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या मालिकेच्या माध्यमातून मयुरी घराघरात पोहोचली. आशुतोष भाकरे याने देखील मराठीतील दोन सिनेमात अभिनेता म्हणून काम केलं आहे. आता आशुतोष होरिझोन मोशन पिक्चर्सचे दिग्दर्शन करत आहे. या अगोदर त्याने इचार ठरला पक्का, भाकर या सिनेमात अभिनेता म्हणून काम केलं आहे. (श्रृती मराठे आणि गौरव घाटणेकरचा विवाह सोहळा) 

मयुरी देशमुखचं खुलता कळी खुलेना या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. एक समजुतदार बहिण आणि प्रेमळ नातं म्हणून मानसी या पात्रातून तिने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. आपल्या अभिनयाच्या वेगवेगळ्या पैलू मयुरी या मालिकेत दाखवत आहे. त्यामुळे तिचा चाहता वर्ग भरपूर आहे. त्यामुळे मयुरीचे एवढ्या लवकर लग्न झाले त्यामुळे चाहते थोडे नाराज आणि उत्सुक आहेत. (मृण्मयी देशपांडेच्या लग्नसोहळाचे फोटो)