असे म्हटले जाते की, प्रेम आंधळं असतं. पण या आंधळेपणात तुमचं दिवाळं निघावं इतकंही ते आंधळं असू नये. मात्र असंच काहीसचं एका अभिनेत्रीच्या आयुष्यात झालं आहे. सर्वात जास्त कमाई करणा-या अभिनेत्रींच्या यादीत असणारी ही अभिनेत्री होती. मात्र, प्रेमात या अभिनेत्रीची अशी अवस्था झाली आहे की रस्त्यावर आली आहे.

हॉलिवूडची अभिनेत्री लिंडसे लोहान सोबत ही घटना घडली आहे. लिंडसे ही तिच्या बॉयफ्रेन्डचं कर्ज फेडता फेडता अशी झाली आहे की, तिलाच आता हॉटेलमध्ये रहावं लागत आहे. डेली मेलने दिलेल्या वॄत्तानुसार, काही दिवसांपूर्वी लिंडसेने बॉयफ्रेन्ड एगर टेरेबसॉवसोबत मिळून लंडनमध्ये ३.५ मिलियन पौंडचं घर रेन्टवर घेतलं होतं. दोघे मिळून या घराचं रेन्ट भरायचे. मात्र, नंतर हळूहळू दोघांमध्ये खटके उडाले आणि दोघे वेगळे झाले. वेगळे झाल्यानंतर लिंडसेच्या बॉयफ्रेन्डने घर सोडले आणि अर्ध रेन्टही दिलं नाही.

जेव्हा त्या घराच्या मालकाने लिंडसे विरोधात नोटीस काढली की, तिने ७७६०० मिलियन पौंडचं रेन्ट थकवलं आहे आणि जर तिने रेन्ट दिलं नाहीतर तिच्या विरोधात कारवाई केली जाईल. हे ऎकल्यावर लिंडसेला धक्का बसला आणि तिने ते सर्व रेन्ट चुकवलं. त्यानंतर लिंडसेवर इतपत पाळी आली की, तिच्याकडे हॉटेलमध्ये राहण्यासाठीही पैसे नाहीयेत. शेवटी एका मित्राच्या मदतीने ती घर सोडून हॉटेलमध्ये शिफ्ट झाली आहे.

ही बातमी सर्वांना कळाल्यावर सर्वांनाच धक्का बसला आहे. यावर कुणाला विश्वासच बसत नव्हता की, एका सिनेमात काम करण्यासाठी ५ मिलियन पौंड इतके पैसे घेणारी अभिनेत्रीची आज ही अवस्था झाली आहे. मात्र, इतक्या अडचणी येऊनही लिंडसेचा विश्वास कायम आहे. केवळ तिला दु:ख याचच आहे की, ज्या व्यक्तीवर तिने इतकं प्रेम केलं, त्या व्यक्तीने तिला या स्थितीत आणून सोडलं आहे.

आता या सगळ्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहे. डेली मेलनुसार, लिंडसे लोहानला तिच्या एका मित्राने अपार्टमेंटमध्ये एकत्र राहण्याची ऑफर दिली आहे. लिंडसे आणि एगर टेरेबसॉव यांचं जुलै दरम्यान ब्रेकअप झालं होतं, तेव्हापासूनच ते दोघे वेगळे झाले. त्यांचा दोघांचा एक भांडणाचाही व्हिडिओ समोर आला होता.