मराठी टीव्ही आणि सिनेसृष्टीत सध्या लग्नांचा मौसम आहे. नुकतीच खुलता कळी खुलेना या मालिकेतील मानसी म्हणजे मयुरी देशमुख विवाहबंधनात अडकली. आणि आता तिच्या पाठोपाठच श्रृती मराठे, मृणमयी देशपांडे, पल्लवी पाटील आणि अतुला दुग्गल या चौघी ही विवाह बंधनात अडकत आहेत. या महिन्यात या चौघींचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. कुणी आपला जोडीदार आपल्या क्षेत्रातील निवडला आहे तर कुणी अरेंज मॅरेज करून आपल्या आई वडिलांची पसंती हीच आपली पसंती असा विश्वास दाखवला आहे. (मयुरी आणि आशुतोषच्या लग्नाचा व्हिडिओ)  

05

मयुरी पाठोपाठच पुढचं पाऊस फेम अभिनेता संग्राम समेळ याचा कालच विवाह सोहळा पार पडला. संग्रामचं रूंजी मालिकेतील अभिनेत्री पल्लवी पाटीलशी लग्न १ डिसेंबर रोजी गुरूवारी झाली. या दोन विवाह सोहळ्यानंतर आणखी तीन विवाह या महिन्यात पार पडणार आहेत. त्यामध्ये तुमच्या सर्वांची लाडकी श्रृती मराठे, मृण्मयी देशपांडे आणि अतुला दुग्गल यांचा समावेश आहे. (खुलता कळी खुलेनाची मयुरी अडकली लग्नबंधनात)

3 - Copy

राधा ही बावरी मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या श्रृती मराठेचा विवाह अभिनेता गौरव घाटणेकरशी होत आहे. हा विवाह सोहळा ४ डिसेंबर रोजी म्हणजे येत्या रविवारी संपन्न होणार आहे. श्रृतीने मराठीतील मालिकांबरोबरच तिने साऊथच्या सिनेमांमध्ये देखील काम केलेली आहे. श्रृती आणि गौरवची ओळख तुझी माझी लव्ह स्टोरी या सिनेमादरम्यान झाली. यांच्या प्रेमाला जवळ जवळ तीन वर्ष झाली आहे. एकमेकांना पुरेसा वेळ दिल्यानंतर श्रृती आणि गौरव आता विवाहबंधनात अडकणार आहे. हे दोघं हनीमुनसाठी बाली येथे जाणार आहेत.

4 (2)

श्रृती मराठे पाठोपाठच आपल्या सर्वांची लाडकी मृण्यमी देशपांडेची लग्नघटिकाही समिप आली आहे. अग्निहोत्र, कुंकू यासारख्या मालिकेतून आपल्या प्रत्येकाच्या मनात घर केलेल्या मृण्मयी देशपांडेचा विवाह सोहळा ३ डिसेंबरला म्हणजे शनिवारी पार पडत आहे. मृण्मयी बिझनेसमन स्वप्नील राव याच्याशी लग्न करत आहे. मृण्मयीने मालिकांबरोबरच कट्यार काळजात घुसली आणि नटसम्राट या सिनेमातंही आपली लक्षवेधी भूमिका साकारली आहे. मृण्यमी आणि स्वप्नीलचे अरेंज मॅरेज आहे.

1

त्याचबरोबर पुढचं पाऊल  आणि होणार सून मी या घरची या मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री अतुला दुग्गल हिचा देखील विवाह सोहळा ४ डिसेंबर रोडी बोरिवलीत पार पडणार आहे. अतुला क्रिएटिव्ह दिग्दर्शक सिद्धव नाचणेशी लग्न करत आहे. त्यांची ओळख एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली आहे. या दोघांचा साखरपुडा पार पडला असून आता अवघे २ दिवस लग्नाला उरले आहे. या दोघांचं लव्हमॅरेज असून ते १ वर्षापासून एकमेकांना ओळखत आहेत.

2 (1)

२०१६ च्या या सरत्या वर्षात या मराठी तारका आणि अभिनेते विवाहबंधनात अडकणार आहे. मालिकेच्या पडद्यावर या कलाकारांनी आपल्याला भरभरून आनंद दिलाच पण आता या जोड्या देखील आपलं मनापासून मनोरंजन करतील यात शंका नाही.