स्वीडिश मॉडेल पिक्सी पॉक्स हिने आपल्या मनासारखी फिगर मिळविण्यासाठी अनेक शस्त्रक्रीया केल्या आहेत. सध्या ती एखाद्या कार्टुनसारखी दिसते. त्यासाठी तिने तब्बल 100 शस्त्रक्रीयाही केल्याचे सांगण्यात येते. मात्र, इतके सगळे करूनही पिस्कीचे मन अद्याप भरले नाही. आजूनही ती आपल्या फिगरवर खुश नाही.

आपली नाराजी दूर करण्यासाठी ती पुन्हा एकदा आपल्या शरीरात बदल करण्याच्या विचारात असून, तिने तशी मानसिक तयारीही केल्याचे सांगितले जात आहे. 16 इंच कंबर करण्यासाठी तिने आपल्या शरीराची 6 हाडेही काढली आहेत. इतकेच नव्हे तर, आपल्या डोळ्यांचा रंग हिरवा करण्यासाठी तिने वेगळ्या पद्धतीची सर्जरीही केली आहे. आपल्या डोक्यातील खूळ पूर्ण करण्यासाठी पिस्कीने स्थनांपासून ते आठांपर्यंत आणि डोळ्यांबासून ते पार्श्वभागापर्यंत अनेक सर्जरी केल्या आहेत. पण इतके करूनही तिचे खूळ पूर्ण झाले नाही. ती नव्या सर्जरीच्या तयारीत आहे.

वय वर्षे अवघे २५ असलेली पिक्सी नॉर्थ केरोलीनात राहते. आपल्या  लूकबाबत बोलताना पिक्सी सांगते, ‘मला या रूपाचे प्रचंड आकर्षण होते. मी जेव्हा या रूपात नव्हते. अगदी सर्वसामान्य व्यक्तीसारखी व्यक्ती होते. तेव्हा मला अशा प्रकारची फिलींग यायची जशी एखाद्या ट्रांन्सजेंडर व्यक्तीच्या मनात राहते.’ ‘डेली मिरर’ने याबाबत वृत्त प्रकाशित केले आहे. या वृत्तानुसार पिक्सी फॉक्सने आपल्या नव्या आवतारातली छायाचित्रे आणि व्हिडीओ इंटरनेटवर टाकताच प्रचंड प्रमाणात व्हायरल झाली आहेत. पहिल्याच दिवळी सुमारे साडे आठ लाकांहून अधिक लोकांनी तिच्या या नव्या आवताराच व्हिडीओ पाहिला आहे. (हेही वाचा, ‘Human Barbie Doll’चा व्हिडीओ झाला व्हायरल, मॉडेल पिक्सी ने खर्च केले १.६५ पौंड (व्हिडीओ))

Pixee Fox
Pixee Fox

या उद्योगामुळे  ती तरूणाईला प्लास्टीक सर्जरी करण्यासाठी उत्तेजन देत असल्याचा आरोप तिच्यावर होतो आहे. मात्र, पिक्सीने या आरोपाचे खंडण केले आहे. ती म्हणते, मी केवळ एकच संदेश देऊ ईच्छिते की, ज्या व्यक्तीला ज्या प्रकारचे दिसावेसे वाटते त्या दर्जापर्यंत पोहोचण्यासाठी तितके परिश्रमही मिळावे लागतात. जगातील प्रत्येक व्यक्तीला त्या त्या व्यक्तिच्या इच्छेनुसार दिसण्याचा, राहण्याचा आणि जगण्याचा अधिकार आहे, असेही ती पिक्सी सांगते.