नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य याच्यासोबत लग्न होणार असल्याने आधीच चर्चेत असलेली साऊथ सिने इंडस्ट्रीतील अभिनेत्री समंथा रूथ प्रभू एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. समंथाने एक खळबळ उडवून देणारं वक्तव्य केल्याने ती चर्चेत आली आहे. समंथाने नुकतेच JFW या मॅगझिनसाठी फोटोशूट केले. यानंतर एका कार्यक्रमादरम्यान तिला काही प्रश्न विचारले गेले असता तिने दिलेल्या एका उत्तरामुळे चर्चांना उधाण आले आहे. सोशल मीडियावर तिचा हा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होतोय.

जेवण आणि सेक्समध्ये तू काय निवडशील, असा प्रश्न तिला विचारला गेला होता. यावर अभिनेता नागार्जुनची होणारी सून समंथा रुथ प्रभू म्हणाली की, ती खाण्याऐवजी सेक्स जास्त पसंत करेल. न अडखळता समंथाने उत्तर दिले. ‘सेक्स एक चांगली आणि नैसर्गिक गोष्ट आहे. यामध्ये चुकीचे असे काही नाही,’ असे ती म्हणाली. समंथाच्या या बोल्ड उत्तरामुळेच सध्या ती चर्चेत आहे. याआधी दिलेल्या एका मुलाखतीत समंथाने हनिमूनबद्दल वक्तव्य केले होते. चैतन्यसोबत 40 दिवसांच्या हनिमूनला जाणार असल्याचे तिने सांगितले होते.

याआधी सिनेमांमधील बोल्ड अंदाजामुळे समंथा चर्चेत होती. मात्र जेव्हा नागार्जुनच्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याची बातमी समोर आली, तेव्हा तिची सर्वांत जास्त चर्चा झाली. दोघांचा साखरपुडा झाला असून 6 ऑक्टोबर रोजी ते विवाहबंधनात अडकणार आहेत. गोव्यात हे ‘डेस्टिनेशन वेडिंग’ होणार असून तीन दिवस हा विवाहसोहळा रंगणार आहे.