असे म्हणतात की प्रेमाला वयाचं बंधन नसतं. खासकरून बॉलिवूडमध्ये तर हे मोठ्या प्रमाणात खरं होताना बघायला मिळतं. असे मानले जाते की, बॉलिवूडमध्ये प्रेम आणि लग्नासाठी कोणतेही नियम नाहीयेत. इतकेच काय तर धर्माचही कोणतं बंधन इथे बघायला मिळत नाही. त्यामुळेच अनेक अभिनेत्री अशा आहेत ज्या आपल्या पतीपेक्षा वयाने ब-याच मोठ्या आहेत. हा फरक कुठे कुठे जास्तही बघायला मिळतो. चला जाणून घेऊया अशाच काही अभिनेत्रींबद्दल….

* ऎश्वर्या राय-अभिषेक बच्चन:

Abhishek Aishwarya at Sarbjit premiere in Mumbai

बॉलिवूड अभिनेत्री ऎश्वर्या राय बच्चन हिचा समावेश जगातल्या सर्वात सुंदर महिलांमध्ये केला जातो. ऎश्वर्याचं सलमान, विवेक ओबेराय यांच्यासोबत अफेअर होते. मात्र या दोघांपैकी एकाशीही तिने लग्न केले नाही. ऎश्वर्याने लग्नासाठी अभिषेक बच्चनची निवड केली. २००७ मध्ये तिने अभिषेकसोबत लग्न केले. ऎश्वर्या अभिषेकपेक्षा २ वर्षाने मोठी आहे.

* शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा:

shilpa shetty raj merge
शिल्पा शेट्टीने १९९३ मध्ये बाजीगर या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. शिल्पाचे अफेअर अक्षय कुमारसोबत होते. मात्र दोघांमध्ये काही कारणास्तव वाद झाले आणि ते वेगळे झाले. त्यानंतर २००९ मध्ये शिल्पाने उद्योगपती स्राज कुंद्रासोबत लग्न केले. शिल्पा राज पेक्षा ३ महिन्यांनी मोठी आहे.

* फराह खान- शिरीष कुंदर:

Farah-Khan-Shirish-Kunder-
प्रसिद्ध कोरिओग्राफर-डिरेक्टर फराह खान हिने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तेच तिचा पती शिरीष कुंदर हा निर्माता म्हणून लोकप्रिय आहे, २००४ मध्ये त्यांनी लग्न केले. फराह ही आपल्या पतीपेक्षा ८ वर्षांनी मोठी आहे.

* प्रिती झिंटा- जीन गुडइनफ:

ciywmjfvaaizquv_1463224736_725x725
डिंपल गर्ल प्रिती झिंटाने १९९७ मध्ये बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. प्रितीचेही नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडले गेले. मात्र, तिने २०१६ मध्ये आपला बॉयफ्रेन्ड जीनसोबत लग्न केले. जीन हा प्रिती झिंटापेक्षा तब्बल १० वर्षांनी लहान आहे.

* बिपाशा बसु- करण ग्रोव्हर:

bipasha-basu-and-karan-singh-final
बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसु ने २००१ मध्ये सिनेमात काम करायला सुरूवात केली होती. त्यानंतर ती एक बोल्ड अभिनेत्री म्हणून गाजली. तिचेही जॉन अब्राहमसोबत संबंध होते. मात्र तिने काही महिन्यांपूर्वी अभिनेता करण ग्रोव्हरसोबत लग्न केले. करण सिंह ग्रोव्हर हा बिपाशापेक्षा ३ वर्षांनी लहान आहे.

* सोहा अली खान- कुणाल खेमू:

704570
अभिनेत्री सोहा अली खान ही अभिनेत्री शर्मिला टागोर यांची मुलगी तर सैफ अली खानची बहिण आहे. सोहाने २०१५ मध्ये आपला बॉयफ्रेन्ड अभिनेता कुणाल खेमू याच्याशी लग्न केले. कुणाल हा सोहापेक्षा ५ वर्षांनी लहान आहे.

* उर्मिला मातोंडकर- मोहसिन अख्तर मीर:

sadsddd-22
हॉट अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने २०१६ मध्ये कश्मीरी उद्योगपती-मॉडेल मोहसीन अख्तर मीरसोबत लग्न केले. मोहसीन हा उर्मिलापेक्षा ९ वर्षांनी लहान आहे.