बऱ्याच प्रतिक्षेनंतर सलमान खान आणि शाहरूख खान आपल्याला स्क्रिन शेअर करताना दिसत आहे. शाहरूख खान आणि सलमान खान स्टार स्क्रिन अॅवॉर्डमध्ये अँकरिंग करणार असल्याचं समजतंय. बॉलिवूडमधील तीन खान पैकी दोन खान आपल्याला एकत्र पाहायला मिळणार आहे. शाहरूख आणि सलमान करण – अर्जुन या सिनेमांनंतर पहिल्यांदा एकत्र पाहायला मिळणार आहे.

सलमान आणि शाहरुखने एकत्र अवॉर्ड शो होस्ट करणे ही बाब बॉलिवूडसाठी खूप मोठी आहे. यामुळे होस्टिंगच्या स्क्रीप्टवरदेखील खूप काम सुरू आहे. मोठ्या गॅपनंतर किंग खान आणि दबंगच्या चाहत्यांना केवळ हे दोघं एकत्र दिसणार नाहीत, तर अनेक मनोरंजक किस्से आणि विनोद ऐकण्याचीदेखील संधी मिळणार आहे. सोशल मीडियावर ‘मेरे करण-अर्जुन आयेंगे’ यावरील जोक्स सर्वाधिक लोकप्रिय आहेत. मात्र, स्क्रीन अवॉर्ड्स शोमुळे हा विनोद आता सत्यात उतरणार असून एकेकाळी ऑन स्क्रीन शेअर केलेले  ‘करण-अर्जुन’ म्हणजेच सलमान- शाहरुख शोच्यानिमित्ताने पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. शाहरुख -सलमानने ‘करण-अर्जुन’ सिनेमामध्ये एकत्र काम केले होते.
 या सिनेमामध्ये राखी यांनी त्यांच्या आईची भूमिका निभावली होती. ‘मेरे करण-अर्जुन आयेंगे’ हा डायलॉग त्या सिनेमामध्ये अनेकदा बोलताना दिसत आहेत. यातच सलमान आणि शाहरुख यांच्या एकत्र येण्याचा उल्लेख केला की, आपसुकच हा डायलॉग सर्वांच्या ओठांवर येतो. उशिराने का होईना पण अखेर ‘करण-अर्जुन’च्या आईची हाक स्क्रीन अवॉर्ड्सने ऐकली. काही वर्षांपूर्वी सलमान आणि शाहरुखच्या नात्यात आलेली कटुता आता संपुष्टात आली आहे. दोघंही एकमेकांच्या सिनेमांचे कौतुक करत आहेत, प्रमोशनदेखील करत आहेत शिवाय आता दोघं एकत्र एक अवॉर्ड शो होस्ट करताना दिसणार आहेत.