करण जोहरच्या कॉफी विथ करण सिझनच्या ५ व्या भागात एक खळबळजनक गोष्ट घडली आहे. या शोमध्ये गेस्ट म्हणून शाहरूख खान आणि आलिया भट आले होते. करण जोहर या भागात भरपूर मस्ती करत आहे. या शो दरम्यान शाहरूख खानने रणवीर सिंहच्या अंडरवेअरवर धक्कादायक कमेंट केली आहे. या कमेंटमुळे बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये भरपूर चर्चा रंगली आहे.

करणने शाहरूख खानला रॅपिड फायर राऊंडमध्ये एक प्रश्न विचारला की, एक सकाळी जर तुम्ही रणीवर बनून उठलात तर काय होईल. शाहरूख खानने या प्रश्नावर दिलेलं उत्तर ऐकून तुम्ही हैराण व्हाल. शाहरूखने मस्करीत त्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे. ते ऐकून तुम्हाला प्रश्न पडेल की, ही पॅडेड अंडरवेअर कुठून आली.

करण जोहरच्या या शोमध्ये अगदी बिंदास आणि खाजगी प्रश्न विचारले जातात. ज्यामध्ये करण जोहर आणि बॉलिवूडमधील अनेक मान्यवर व्यक्ती सहभागी होतात. शाहरूख आणि आलियानंतर या एपिसोडमध्ये करिना कपूर आणि सोनम कपूर सहभागी होणार आहे.