नवी दिल्ली – आपलं प्रत्येकाचं हक्काचं घर असावं असं प्रत्येकालाच वाटतं असतं. सामान्य माणसांप्रमाणेच सेलिब्रेटींचही असंच काही ना काही स्वप्न असतं. अभिनेत्री सनी लिओनीचंही असंच स्वप्न होतं. यासाठीच सनी लिओनी हिने आपला पती डेनियल वेबर याच्यासोबत मिळून अमेरिकेतील लॉस एंजिलिस येथे एक बंगला खरेदी केला आहे. सनी लिओनीने खरेदी केलेला हा बंगगला शेर्मन ओक्स परिसरात आहे. शेर्मन ओक्स हा असा परिसर आहे जेथे अनेक हॉलिवूड स्टार्सचं घर आहे.

Sunny

अभिनेत्री सनी लिओनी हिने 13 मे रोजी आपला पती आणि काही मित्रांसोबत कॅलिफोर्निया येथे आपला वाढदिवस साजरा केला. सनी लिओनीचा हा बंगला म्हणजे तिचं बर्थडे गिफ्ट असल्याचं बोललं जात आहे.

Sunny 1

तुम्हाला कळल्यावर आश्चर्य वाटेल की, सनी लिओनीचं हे घर खुपच मोठ आहे. सनीने स्वत: आपल्या ट्विटर अकाउंटवर आपले काही फोटोज शेअर केले आहेत आणि यासंदर्भात माहिती दिली आहे. सनी लिओनीच्या या बंगल्यात 5 बेडरुम, एक स्विमिंग पूल, होम थिएटर, गार्डनचा समावेश आहे. हा बंगला जवळपास 1 एकर क्षेत्रफळात बांधण्यात आला आहे.

Sunny 2

सनी लिओनीने जे फोटोज ट्विटरवर शेअर केले आहेत ते पाहून स्पष्ट दिसत आहे की, तीचा बंगला खुपच आलिशान आहे. सनी लिओनी आणि तिचा पती डेनियल लवकरच या बंगल्यामध्ये शिफ्ट होणार असल्याचं बोललं जात आहे.

Sunny 3

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, डेनियल आणि सनी लिओनी गेल्या अनेक दिवसांपासून अलिशान बंगला खरेदी करण्यासाठी शोधत होते. मात्र, त्यांना चांगला बंगला मिळत नव्हता. मात्र, आता सनी लिओनीच्या वाढदिवसापूर्वी हा बंगला त्यांना मिळाला आणि त्यांचं स्वप्न पूर्ण झालं.

अभिनेत्री सनी लिओनी ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे. सनी लिओनीने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये तसेच गाण्यांमध्ये काम केलं आहे. सनीने बॉलिवूडमध्ये आपला जलवा कायम ठेवला असून तिच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सनी लिओनीने बॉलिवूडमधील अनेक मोठ-मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केलं आहे.