क्रिकेट आणि सिने इंडस्ट्री यांचं जुनं आणि अतिशय रूळलेलं नातं आहे. अनेक क्रिकेटर्स आणि बॉलिवूड अभिनेत्रींची प्रेम प्रकरणे चांगलीच गाजली. आता युवराज सिंग आणि हेजल किच यांच्या लग्नामुळे या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. युवराजने नुकतेच पारंपारिक पद्धतीने हेजलसोबत लग्न केले असून दोघांच्याही लग्नाची चर्चा जोरात रंगली आहे. युवराजचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले मात्र त्याने लग्न केले ते हेजलसोबत..हेजल ही अभिनेत्री असून तिने काही सिनेमांमध्ये आयटम नंबरही केले आहेत. चला जाणून घेऊया या युवराजच्या पत्नीबद्दल…. (बघा: युवराज सिंहच्या होणा-या बायकोचा व्हिडीओ व्हायरल)

hazel-keech 1

१) इंग्लंडमध्ये जन्मलेली हेजल सुट्ट्यांमध्ये भारतात फिरायला आली होती. तेव्हा ती केवळ १८ वर्षांची होती. नंतर तिला इथेच थांबावं लागलं कारण तिला पुढे मॉडेलिंगची ऑफर मिळाली.

maxresdefault

२) २००७ मध्ये आलेल्या बॉडीगार्ड सिनेमात हेजलने करीना कपूरच्या बहिणीची भूमिका केली होती.

hazel-keech-images-wallpapers-hd-photos-15

(Image Credit: Bollywood News)

३) टिव्ही जगतात हेजलने रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस सीझन ७’, ‘झलक दिखला जा’ आणि कॉमेडी सर्कसमध्ये काम केले आहे.

४) २०१२ मध्ये आलेल्या ‘मॅक्झिमम’ सिनेमात तिने एक आयटम सॉंग केले होते. ‘आ अण्टे अमलापूरम’ गाणं तुम्ही पाहिलं असेल त्यातही हेजल आहे.

2c3902893c3c59b57e9c071d57c58571

(Image Credit: www.pinterest.com)

५) नंतर ‘हिर अ‍ॅन्ड हिरो’मध्येही तिने एक आयटम सॉंग केलं होतं.

६) खूप कमी लोकांना हे माहिती आहे की, हेजल ‘हॅरी पॉटर’च्या काही सीरीजमध्येही दिसली आहे. हॅरी पॉटरच्या ३ सिनेमांमध्ये ती हॅरीची मैत्रीण बनली आहे.

Hejal

७) तसा हेजलला पहिला ब्रेक २००७ मध्ये आलेल्या तमिळ ‘बिल्ला’ या सिनेमात मिळाला होता. त्यात तिने एक आयटम सॉंग केलं होतं.

८) हेजलला फिरण्याची खूप आवद आहे आणि तिला वॉटर स्पोर्ट्समध्ये सर्फिंग करणेही आवडते.

hazel-story_647_090615012235_090815011655

९) हेजलचे अनेक म्युझिक व्हिडिओज आहेत. ज्यातील पहिला होता ‘कहीं पे निगाहे’.