(Images Credit: BollywoodShaadis)

प्रत्येक बायकोला नव-याने दिलेले गिफ्ट पसंत असते. नव-यांनी आपल्या गिफ्ट द्यावं असंही अनेक बायकांना वाटत असतं. नव-याने दिलेल्या गिफ्टचं एक वेगळंच महत्व असतं. प्रेमाने दिलेल्या गिफ्टला महत्वही मोठं असतं. मात्र, कधी कधी असंही होतं की, काही गिफ्ट्स आपल्यासाठी टेन्शन बनून जातं. असंच काहीसं बॉलिवूडच्या एका कपलसोबत घडलं होतं.

त्या काळात अभिनेत्री नर्गिस यांचे अनेक सिनेमे सुपरहिट होत होते. मात्र आपल्या पर्सनल आयुष्यात त्या अजिबात सुखी नव्हत्या. सुरूवातीला नर्गिस यांचं नाव अभिनेते राज कपूर यांच्यासोबत जोडले गेले. असे म्हटले जाते की, राजकपूर आणि नर्गिस लग्न करणार होते. मात्र राज कपूर यांनी नंतर लग्नाला नकार दिला. त्यामुळे नर्गिस खूप एकट्या पडल्या.

article-l-201636910394838388000

दुसरीकडे नर्गिस यांच्या भावानेही त्यांच्याशी नातं तोडलं. अशातच एका सिनेमाच्या सेटवर नर्गिस यांची भेट सुनील दत्त यांच्याशी झाली होती. दोघांमध्ये मैत्री झाली. नर्गिस या आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट सुनील दत्त यांना सांगत होत्या. दोघांमध्ये जवळीक वाढली. नंतर दोघांनी लग्न केले. लग्नाआधी नर्गिस यांनी धर्मपरिवर्तन केले होते.

नर्गिस या सुनील दत्त यांच्यावर खूप प्रेम करायच्या. दोघेही प्रत्येक पार्टीत ऎकमेकांचे हात हातात घेऊन असायचे. पण या दोघांबाबत एक किस्सा चांगलाच लोकप्रिय आहे. सुनील दत्त नेहमीच नर्गिस यांच्यासाठी साड्या आणायचे. सुनील यांनी दिलेली प्रत्येक साडीचं चुंबन घेऊन त्या कपाटात ठेवून द्यायच्या. नंतर हळूहळू सुनील दत्त यांच्या लक्षात आले की, नर्गिस या त्यांनी दिलेली साडी कधीच घालून दिसल्या नाही.

एक दिवस सुनील यांनी नर्गिस यांना विचारले की, तू मी आणलेली एकही साडी का नेसत नाही? गपचूप कपाटात ठेवून देतेस? सुनील यांच्या या प्रश्नावर नर्गिस यांनी उत्तर दिले. त्या म्हणाल्या की, तुम्ही आणलेली एकही साडी पसंत नाही आली. त्यामुळे तुम्ही दिली म्हणून त्या साड्या मी ठेवून घेते. ते ऎकून सुनील दत्त हसायला लागले.