IIFA मध्ये अनेक बॉलिवूडकरांनी हजेरी लावली. त्यातील अनेकजण आपल्या स्टाईलमुळे चर्चेत आले आहेत. यात नर्गिस फाखरीच नावही आहे. नर्गिसने आपले काही हॉट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंची चर्चा रंगली आहे. नर्गिस या ड्रेसमध्ये कमालीची सुंदर आणि आकर्षक दिसत असल्याने तिचे फोटो व्हायरल झाले आहेत.

या फोटोंवर तिच्या चाहत्यांकडून कमेंट केल्या जात आहेत. तिच्या सुंदर डोळ्यांचं कौतुक केलं जात आहे. या फोटोंसोबतच नर्गिसचे इतरही फोटो नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. हे फोटो चाहत्यांकडून नेहमीच शेअर केले जातात.

Feeling Fabulous #iifa2017

A post shared by Nargis Fakhri (@nargisfakhri) on

ब-याच दिवसांपासून नर्गिसचा सिनेमा आलेला नाहीये मात्र तरीही तिची लोकप्रियता जराही कमी झालेली नाहीये. 37 वर्षीय नर्गिस IIFA 2017 साठी न्यूयॉर्कमध्ये गेली होती. नर्गिसचा शेवटचा सिनेमा ‘बॅंन्जो’ हा होता. मात्र या सिनेमाला फारसं यश मिळालं नाही.

Take me back. #tb #bali

A post shared by Nargis Fakhri (@nargisfakhri) on

या फोटोंचं एकीकडे कौतुक केलं जात असलं तरी काहींनी यावर टिकाही केली आहे. तर काही फॅशन वेबसाईट्सनी या ड्रेसिंगला बेकार ड्रेसिंग असलेल्या अभिनेत्रींच्या यादीत टाकलं आहे. काही का असे ना तिच्या जास्तीत जास्त चाहत्यांना तिचे हे फोटो पसंत पडत आहे. बाकी कुणी काही म्हटल्याने काय होणार आहे. या निमित्ताने ती पुन्हा ब-याच दिवसांनी चर्चेत आली हे महत्वाचे.