मंगळवारी रिलीज झालेल्या टिस्का चोप्राच्या चटणी या शॉर्ट फिल्मने सोशल मीडियावर धुमाकूळ असतात. १६ मिनिटांच्या या शॉर्ट फिल्ममध्ये टिस्का चोप्राचा अगदी साधा लूक दिसत आहे. मध्यम वर्गीय महिलेच्या भूमिकेत टिस्का आपल्याला दिसत आहे.

ही शॉर्ट फिल्म Extra Maritual Affairs वर आधारित आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये टिस्काचा नवरा तिच्या शेजारी राहणाऱ्या स्त्री सोबत विवाहबाह्य संबंध असतात. त्यावर भाष्य करणारा हा व्हिडिओ आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये टिस्काला सतत ती गाजियाबादची असल्यामुळे तिला टोमणे मारले जातात. या शॉर्ट फिल्ममध्ये गाजियाबादला एक कॅरेक्टर म्हणून वापरण्यात आले आहे. या शॉर्ट फिल्मचा क्लायमॅक्स पाहिल्यावर तुम्ही देखील गोंधळात पडाल.

या शॉर्ट फिल्मची सुरूवात एका पार्टीने होते. जिथे एक महिला टिस्काची खिल्ली उडवली होती. त्याच ग्रुपमधील एक महिलेची नजर टिस्काच्या नवऱ्याकडे वळते. आणि संधी मिळताच ती त्याच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न करते. आणि त्या दोघांच्या वेगळ्या हालचालींवर टिस्काचं लक्ष जातं. मात्र ती तिथे काहीच रिअॅक्ट होत नाही. मात्र ती त्या दुसऱ्या महिलेला आपल्या घरी आमंत्रित करते.

दुसऱ्या दिवशी ती महिला टिस्काच्या घरी येते. तेव्हा टिस्का तिला भजी आणि चटणी खायला देते. चटणीच्या स्वादवरून ती महिला तिला सांगते की, यामध्ये वापरलेली कोथिंबीर, मिरची, लिंबू, पुदीना हे सर्व घरातील असायला हंव. बाजारातून आणलेल्या या गोष्टींमध्ये तेवढी चव नसते. आणि तिच्या या वाक्याचा या शॉर्ट फिल्ममध्ये भरपूर मोठा अर्थ आहे. आणि जे पाहण्यासाठी तुम्हाला ही शॉर्ट फिल्म पाहावी लागेल.