टीम इंडियाचा क्रिकेटर युवराज सिंह आणि मॉडेल-अभिनेत्री हेजल किच आज लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. चंदीगडपासून ५० किमी अंतरावर असलेल्या फत्तेपूर साहिबमध्ये युवराज आणि हेजल यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे. लग्नसमारंभानिमित्त एका हॉटेलमध्ये संगीत कार्यक्रमाचंही आयोजनही करण्यात आलं होतं. टीम इंडियाच्या खेळाडूंनीही युवराजच्या संगीतला हजेरी लावली होती. तसंच युवराज सिंहने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लग्नाचं आमंत्रण दिलं आहे.

yuvraj hazel
yuvraj hazel

युवराज आणि हेजल यांचा विवाह हिंदू आणि शीख रितीनुसार होणार आहे. आज पंजाबी रिवाजानुसार चंदीगडमध्ये त्यांचा विवाह होईल. तर 2 डिसेंबरला गोव्यात हिंदी रितीनुसार ते बोहल्यावर चढतील. मागील वर्षी 11 नोव्हेंबर रोजी बालीमध्ये हेजल आणि युवराजचा साखरपुडा झाला होता.

see-here-yuvraj-singh-and-hazel-keech-wedding-card-and-sweets-5-26-1480152582

युवी आणि हेजलच्या लग्नाला या व्यक्ती उपस्थित –
 लग्नासाठी छापलेल्या या प्रिमीयर लग्नपत्रिका तब्बल ३०० लोकप्रिय व्यक्तींना पाठविण्यात आल्या आहेत. क्रिकेट आणि बॉलिवूडमधील दिग्गजांचा यामध्ये समावेश आहे. युवराजच्या लग्नासाठी क्रिकेट आणि बॉलिवूडमधील ३०० लोकप्रिय चेहरे युवीच्या लग्नाला उपस्थितीत राहणार हे जवळ जवळ निश्चित मानले जात आहे. यात अनुष्का शर्मा, गीता बसरा, फराह खान, नेहा धुपिया आणि बी टाउनमधील युवी आणि हेजलचे जवळचे मित्रमंडळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Yuvraj

आपल्या लग्नसमारंभात सामिल होणाऱ्या मोजक्या पाहुण्यांसाठी युवीने खास तयारी केली आहे. खाद्याच्या मेनूमध्ये चायनिज. कॉन्टिनेटल, इटालियन आणि थाई खाण्याची मेजवानी असेल. चंदिगड पासून ५० कि.मी अंतरावर असणाऱ्या फत्तेगड साहिबमध्ये युवी-हेजल यांचा लग्न सोहळा संपन्न होणार आहे. युवी-हेजलच्या स्वागतासाठी त्याची आई शबनम या नव्या घराच्या सजावट करण्यामध्ये दंग झाल्या आहेत. सध्या युवराजची आई पंचकुलामधील मनसा देवी कॉम्पलेक्सच्या नव्या घराला सजावट करुन घेण्याची जोरदार तयारी करत आहेत. त्यामुळे ३० नोव्हेंबरला लग्नसमारंभ पार पडल्यानंतर युवी-हेजल आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात या नव्या घरातून करतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.