नवी दिल्ली: पॉर्न फिल्म्स बघणे ही नवी गोष्ट नाहीये. तरूणाई अशाप्रकारचे सिनेमे बघण्यात पुढे असतात. इतकेच नाहीतर अनेक शोधांनुसार महिलाही पॉर्न बघण्यात अग्रेसर आहेत. भारतातील महिला यातही आघाडीवर असल्याचा खुलासा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला होता. मुळात पॉर्न फिल्म पाहणे यामुळे तरूणांचं मोठं नुकसान होऊ शकतं. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘इंटरनेटवर पॉर्न पाहिल्यामुळे १० पैकी एका तरुणाला इरेक्शनसंबंधी समस्या होत आहेत.

तर तज्ज्ञ डॉक्टरांनुसार, ‘पॉर्न अगदी सहजरित्या उपलब्ध होत असल्याने निरोगी तरुणांमध्ये अशा शारीरिक समस्या निर्माण होत आहेत, ज्या साधारण वयोमानानुसार पाहायला मिळतात. १३ ते २५ वर्षांपर्यंतच्या तरुणांमध्ये या समस्या आढळल्या आहेत. याचे दुरगामी परिणामही तरूणांवर पहायला मिळतात.

नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्व्हेक्षणानुसार, ‘एक तृतीयांश लोक रोज पॉर्न पाहतात. इतकेच नाहीतर गेल्या काही वर्षांमध्ये पॉर्न पाहण्याच्या सवयीमध्येही वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. स्मार्टफोनच्या वाढत्या वापरासोबतच पॉर्न पाहण्याचे प्रमाण वाढत आहे. सर्व्हेक्षणादरम्यान एका तरुणाने सांगितले की, ‘सतत पॉर्न पाहिल्यामुळे मला पर्मोच्च आनंद (orgasm) मिळवण्यात अडचण येण्याची शक्यता आहे.
काही जणांमध्ये पॉर्न पाहिल्यामुळे टोकाचा सेक्स करण्याची भावना निर्माण होते, मात्र सेक्सप्रति सामान्य उत्तेजन निर्माण होत नसल्याची समस्या त्यांच्यात दिसून आली आहे. ९० दिवसांमध्ये कुठल्याही पूर्वतयारीशिवाय अचानक पॉर्न पाहणे पूर्णपणे बंद केल्यास ही समस्या संपुष्टात येऊ शकते, असे ग्रेगरी यांनी सांगितले. पॉर्न पाहिल्याने तरुणांच्या डोक्यामध्ये सेक्ससंदर्भात काल्पनिक गोष्टी तयार होऊ लागतात. पॉर्नमध्ये सेक्स अतिशय सहजपणे दाखवला जातो, पण ख-या आयुष्यात लोकं सेक्स करण्यासाठी नेहमीच तयार नसतात.