सृष्टीच्या विकासासाठी ब्रम्हदेवाच्या सांगण्यावरून भगवान शिवने मैथुनी सॄष्टीची रचना केली. मैथुनी सृष्टीमध्ये स्त्री आणि पुरूष यांच्यातील शारिरीक संबंध आवश्यक झाले. मात्र, शारिरीक संबंधाशी निगडीत काही नियम आवश्यक झाले जेणेकरून संतुलन आणि माणसाचं स्वास्थ्य प्रभावित होऊ नये, सोबतच सॄष्टीत व्यभिचारही पसरू नये.

ब्रम्हदेवाचा पुत्र मनु महाराज ज्याला पुथ्वीवरील सर्वात पहिला मानव म्हटलं जातं त्याने मनुष्याच्या चांगल्या जीवनासाठी काही नियम तयार केले. त्यात या नियमांचा समावेश आहे. मानवाने कधी शारिरीक संबंध ठेवावे याचे काही नियम आहेत. शारिरीक संबंध हे प्रत्येक पुरूष-महिलांच्या आयुष्यात महत्वाचा भाग आहे. पण त्याचेही काही नियम आहेत.

* ज्या व्यक्तीला झोपेचा त्रास आहे. ज्याला झोप येत नाही किंवा झोपण्यासाठी अडचनी येतात त्याने शारिरीक संबंध ठेवण्यापासून दूर असले पाहिजे.

* जेव्हा शरिर पूर्णपणे थकलेले असेल, शरिरात अधिक थकवा जाणवत असेल तर अशावेळी सेक्स केल्याने स्वास्थ्यावर विपरीत परीणाम होण्याची शक्यता असते.

* मनात मोठ्या प्रमाणात वासना असेल अशा स्थितीत शारिरीक संबंध बनवणे योग्य नाही. अशा अवस्थेत मान-सन्मान याची हानी होतात. शारिरीक संबंध ऎकमेकांचा सन्मान ठेवून केले गेले पाहिजे.

* जर एखादी व्यक्ती चिंताग्रस्त असेल, अनेक चिंता त्या व्यक्तीला सतावत असेल तर त्या व्यक्तीने चुकूनही सेक्सचा विचार करू नये. कारण अशात ना त्याला आनंद मिळेल ना त्याच्या पार्टनरला.

* तुम्ही जर अस्वस्थ असाल तर चुकूनही शारिरीक संबंध ठेवण्याचा विचार करू नका. कारण अशात जर तुम्ही संबंध ठेवले तर जन्माला येणारे बाळही अस्वस्थ असण्याची शक्यता असते.

* जेव्हा एखाद्या व्यक्तीने आपला जवळच्या खास व्यक्तीला गमावलं असेल, त्यामुळे तो धक्क्यात असेल तर अशावेळी सेक्स करणे चुकीचे ठरेल.

* जेव्हा एखादी व्यक्ती ज्ञान साधना करत असेल तर अशावेळीही कुणी त्याला शारिरीक संबंधासाठी प्रेरीत करू नये.