मुंबई: इंडिया मॅगझिनने २०१६ साठी केलेल्या सेक्स सर्व्हेमधून अनेक रोमांचक गोष्टी समोर आल्या आहेत. या सर्व्हेतून अनेक नवे खुलासे झाले असून यात सांगण्यात आलं आहे की, गेल्या ५ वर्षाच्या तुलनेत महिला आता सेक्सबद्दल खुलेपणाने बोलायला लागल्या आहेत. तेच या सर्व्हेत ७५ टक्के लोकांनी सेक्स त्यांच्या जीवनातील महत्वाचा भाग असल्याचे म्हटले आहे.

कुणी घेतला होता सहभाग?
इंडिया टुडेने हा सर्व्हे मार्केटिंग अ‍ॅन्ड डेव्हलपमेंट रिसर्च असोसिएट्स एजन्सीच्या सहयोगाने केला. देशातील १७ शहरांमध्ये करण्यात आलेल्या या सर्व्हेत एकूण ४०४२ लोकांनी सहभाग घेतला होता. यात २० वर्षांपासून ते ६९ वयापर्यंतच्या पुरूष आणि महिलांनी सहभाग घेतला होता. (हे पण वाचा: सेक्स करताना परमोच्च सुख कसं मिळवणार?, अभ्यासातून खुलासा)

या प्रश्नावर मिळाला मोठा हो! 
सेक्स सर्व्हे २०१६ मध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांमध्ये महत्वाचा प्रश्न होता की, काय तुम्ही सेक्सला जीवनात महत्वपूर्ण मानता? ७५ टक्के लोकांनी याचे उत्तर होय असे दिले आहे. तर काय तुमचा आणि तुमच्या पार्टनरचा सेक्सबद्दल एकसारखा दृष्टीकोन आहे? या प्रश्नावरही ७० टक्के लोकांनी होय असं उत्तर दिलं.

७७ टक्के लोकांनी मान्य केलं की, ते आपल्या पार्टनरप्रति आकर्षण फिल करतात. इतकेच नाहीतर या सर्व्हेत ८६ टक्के लोकांनी हे सांगितले की, ते त्यांच्या सेक्स लाईफने संतुष्ट आहेत. (हे पण वाचा: रात्री अंडरविअर घालून झोपण्याचे काय आहेत तोटे?)

कसा पार्टनर आहे आयडिअल?

्सर्व्हेत विचारण्यात आलं की, ते समोरचा व्यक्ती आपला आयडिअल पार्टनर असल्याचे कसे मानतात? यावर ४१ टक्के लोकांचं उत्तर होतं की, फिजिकल रिलेशनला कंट्रोल करणारा पार्टनर बेस्ट असतो.

तेच बेडमध्ये एक्सपरिमेंट करणा-या पार्टनरला ३४ टक्के लोकांनी आयडिअल पार्टनर मानले आहे. २५ टक्के लोकांनी जे आपली सेक्सची इच्छा जाहीर करतात त्यांना आयडिअल पार्टनर मानले आहे.

महिला झाल्या मोकळ्या:
बदलत्या काळानुसार महिला सुद्धा सेक्स विषयावर आपलं मत मांडू लागल्या आहेत. २००३ मध्ये झालेल्या अशाच एका सर्व्हेत ६६ टक्के महिलांनी मानले होते की, सेक्स त्यांच्यासाठी आवश्यक आहे. तेच यावर्षी ८० टक्के महिलांनी खुलेपणाने सांगितले होते की, रिलेशनशीपमध्ये सेक्सला खूप महत्व आहे. (हे पण वाचा: महिलांनी सेक्स करण्यापूर्वी या ‘९’ गोष्टींचे ठेवावे भान)

जास्त अ‍ॅडव्हेंचरस आहेत महिला:
सर्व्हेमधून जेव्हा प्रश्नांना उत्तर मिळाली तेव्हा अनेक गोष्टींचे भ्रमही मोडले गेले. ४०४२ लोकांपैकी ७ टक्के पुरुषांनी मान्य केले की, त्यांना सेक्समध्ये अ‍ॅडव्हेंचर पसंत आहे. तर ८.६ टक्के महिलांनीही होय असं उत्तर दिलं. ३६.३ टक्के पुरूषांच्या तुलनेत ४०.४ टक्के महिलांनी मानलं की, त्यांच्यासाठी सेक्स आवश्यक आहे. काय सेक्सबाबत त्यांच्यासोबत कधी जबरदस्ती झाली? यावर १९.८ टक्के पुरूषांनी आणि २०.१ टक्के महिलांनी होय असे उत्तर दिले.

दिल्लीने पॉर्न नाही पाहिले:
सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या दिल्लीवासियांपैकी ५८ टक्के लोकांनी सांगितले की, त्यांनी पॉर्न पाहिले नाही. तेच मुंबईतील ९६ टक्के लोकांनी सांगितले की, ते सेक्स लाईफमध्ये संतुष्ट आहेत.