अलिकडे गरमीपासून सुटका मिळवण्यासाठी AC चा वापर सर्रास वाढला आहे. अनेकांच्या घरीही AC आणि ऑफिसमध्येही AC आहे. AC आता आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. प्रवास करायचा म्हटला तरी AC बस किंवा कॅब वापरली जाते. मात्र काय तुम्हाला माहिती आहे की, AC आपल्या शरिरासाठी किती हानीकारक आहे ? AC च्या सवयीमुळे आपल्या शरिरात अनेक प्रकारच्या समस्या आणि आजार निर्माण होतात.

AC मुळे सर्वात मोठी होते ती आपलय शरिराला स्वच्छ हवा न मिळणे. AC ऑन करायच्याआधी आपण खिडक्या-दरवाजे बंद करतो. या कारणाने रूममध्ये तेवढ्याच एरियात हवा बंद होते. ज्यामुळे आपल्या शरिराला स्वच्छ हवा मिळत नाही आणि आपल्या शरिराचा विकास होण्यास याचा अडसर होतो.

AC मध्ये झोपताना आपण अनेकदा रूममधील तापमान अधिक थंड करतो. आपलं शरिर एका लिमिटपर्यंतच थंडी सहन करू शकतं. झोपताना एक अशी वेळ येते, जेव्हा आपलं शरिर खूप थंड होतं आणि आपल्याला माहितीही पडत नाही. या थंडीमुळे आपल्याला शरीरात हाडांच्या समस्या सुरू होतात.

आपण जसाही AC ऑन करतो त्याच्या थंडाव्यामुळे आपला घाम सुकून जातो. मात्र AC रूमसोबत सोबत शरिरातील गरमीही ओढून घेतो. शरिरातील उष्णता कमी झाल्याने शरिरातील पाणी कमी होतं. त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात. तसेच वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो. त्वचेचे अनेक रोग आपल्याला जाळ्यात घेतात.

AC मुळे आपल्याला काही फायदे नक्कीच होतात, पण याचे नुकसानही जास्त आहेत. आपण आराम मिळावा म्हणून अशाप्रकारे यात गुंतत जातो की, आरोग्याकडे लक्ष देत नाही. याचं नुकसान आपल्याला मोठी किंमत चुकवून द्यावी लागते. AC चा वापर फारच काळजीपूर्वक करायला पाहिजे.