पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये वाढदिवसादिवशी केकवर कँडल लावून विझवण्याची एक संस्कृती होती. त्यानंतर ही गोष्ट हळूहळू सगळीकडे पसरत गेली. आणि आता जगभर वाढदिवसा दिवशी केकवर कँडललावून विझविली जाते. लग्नाच्या किंवा जन्माच्या वाढदिवशी केक आणून त्या व्यक्तीला समोर बसवलं जातं. आणि केकवर कधी एक दोन तर कधी असंख्य कँडल लावून त्यांना विझवायला सांगितली जाते. आता तर लगेच न विझणाऱ्या कँडललावून त्या व्यक्तीला त्रास दिला जातो. पण आता एका सर्व्हेनुसार माहिती समोर आली आहे की, केकवरील कँडल विझवणे हानिकारक आहे.

साऊथ कॅरोलिनाच्या क्लेमसन विद्यापीठातील संशोधकांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, मेणबत्या विझवताना बऱ्याचदा थुंकी केकवर पसरण्याची बरीच शक्यता असते. त्यामुळे 1400% जीवाणू त्या केकवर बसण्याची शक्यता असते. हा रिसर्च करणारे डॉ डाव्हसन आणि त्याच्या टीम ही माहिती समोर आल्यानं आश्चर्यचकीत झाले. याबाबत रिसर्च करत असताना त्यांना ही धक्कादायक माहिती मिळाली. यामुळे डॉ, डाव्हसन यांच्या मते, यापुढे केकवर मेणबत्या लावणंच बंद करायला हवं.

पण अनेक वैज्ञानिकांच्या मते, ‘मनुष्याचा तोंडात अनेक जीवाणू असतात. पण त्यातील सगळ्याच घातक नसतात. त्यामुळे ही समस्या फार गंभीर असल्यास यावर नक्कीच विचार केला गेला असता.’ डॉ. डाव्हसन यांच्या मते, जर कोणी आजारी व्यक्ती मेणबत्या विझवून केक कापत असेल तर असा केक खाणं शक्यतो टाळावं.

डॉक्टरांनी हे देखील सांगितले आहे की, जर आजारी व्यक्तीचा बर्थ डे साजरा केला आणि त्याने कँडल फुंकल्या तर तो केक खाणे बाकिच्यांनी टाळा. बर्थ डे केक वरील कँडल विझणे सामान्य वाटत असले तरीही ही गोष्ट गंभीर असल्याचं समजलं जातं.