अमरनाथ यात्रेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची घटना ताजी असतानाच आता पून्हा एक वाईट बातमी समोर आली आहे. अमरनाथ यात्रेला जाणा-या भाविकांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून 11 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात 35 प्रवासी जखमी झाले आहेत.

जम्मू-काश्मीरमधील रामबाण जिल्ह्यातील बनिहाल येथे हा अपघात झाला आहे. अपघाताचं कारण नेमकं काय, हे अद्याप समजू शकलेलं नाहीये. अपघाताची माहिती मिळताच तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आलं असून भाविकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अपघातग्रस्त बस अमरनाथ यात्रेच्या भाविकांना जम्मूहून पहलगाम इथे घेऊन जात होती. रस्त्यातच ही दुर्दैवी घटना घडली.

या अपघातामध्ये 11 भाविकांचा मृत्यू झाला असून 35 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. या अपघाताची माहिती मिळताच भारतीय लष्कराचे जवान घटनास्थळी दाखल झाले.