पश्चिम बंगाल: लष्कराच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात तीन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात पश्चम बंगाल येथील सुकाना येथे घडला. बुधवारी सकाळी 10.30 वाजता झालेल्या या अपघातात एक अधिकारीही गंभीर जखमी झाला आहे. जखमी अधिकाऱ्याला वैद्यकीय उपचारासाठी रूग्णालयात दाखर करण्यात आले आहे. अपघाताची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, अपघात घडला तेव्हा लष्कराचे तीन अधिकारी आणि वैमानिक असे चार लोक हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. हेलिकॉप्टरचे नाव चिता असे असून, हे हेलिकॉप्टर लष्कराच्या ताफ्यातील होते. पाच आसनी असलेल्या या हेलिकॉप्टरचे वैशिष्ट्य असे की, वजन आणि गुरूत्वाकर्षणमध्य आणि उंचीवर चांगली कामगिरी बजावणारे असे हे हेलिकॉप्टर होते. सर्वाधिक उंचीवर उडण्याचा विक्रमही या हेलिकॉप्टरने नोंदविला आहे. अशी माहीत हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने नोंदविले आहे.

दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. लष्कराकडून याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, अशा प्रकारे दुर्घटना होणे ही चिंतेची बाब असल्याचे लष्करविषयक अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी मत व्यक्त केले आहे.