बेंगलुरु: कोणता चोर कधी काय चोरेल याचा काही नेम नसतो याचं ताजं उदाहरण बेंगळुरूमध्ये बघायला मिळालं. येथील शेशाद्री रोडवरील महाराणी आर्टस अ‍ॅन्ड कॉमर्स महिला कॉलेजच्या होस्टेलने सोमवारी एक अजिब तक्रार दाखल केली आहे. कॉलेजचा आरोप आहे की, एक अज्ञात व्यक्ती नेहमीच रात्री होस्टेलमध्ये येतो आणि मुलींच्या सुकायला ठेवलेल्या अंडरविअर घालून पळून जातो.

होस्टेलच्या अधिका-यांनी पोलिसांनी १२ फेब्रुवारीचं सीसीटीव्ही फुटेज सोवपलं असून ज्यात स्पष्ट दिसतं की, एक न्यूड व्यक्ती रात्री होस्टेलमध्ये घुसत आहे आणि विद्यार्थिनींचे गारमेंट्स घालत आहे. या फुटेजमध्ये एका जाही सिक्युरिटी गार्ड त्याचा पाठलाग करत असताना दिसतो आहे, मात्र तो तिथून पसार होण्यात यशस्वी होतो. (हे पण वाचा: महिलांच्या ब्रा चोरून तरूण करायचा हे विचित्र काम)

मुख्याध्यापल शांतकुमार यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली की, हा व्यक्ती नेहमीच होस्टेलच्या परिसरात दिसतो. होस्टेलच्या मुलींनी त्याला अनेकदा भींत ओलांडून येता-जाता पाहिले आहे. काही महिन्यांपूर्वी त्याला पाहून एक मुलगी ओरडलीही होती. तेव्हापासून अनेक दिवस तो गायब झाला होता. (हे पण वाचा: महिलांच्या अंडरविअर चोरून पुजारी करायचा हे विचित्र काम!)

त्यानंतर अचानक फेब्रुवारी महिन्यात तो पुन्हा आला. त्याने पुन्हा तसाच प्रकार केला. एका विद्यार्थिनीने सांगितले की, हा व्यक्ती त्याच्यासोबत डझनभर अंडरगार्मेंट्स घेऊ गेला. पोलिसांना संशय आहे की, अंडरगार्मेंट्स चोरणारा हा चोर याच परिसरातील आहे. त्याला लवकरात लवकर पकडण्याचा डाव आखला जात आहे.