कोलकाता: ऑनलाईन गेम ब्लू व्हेलमुळे आणखी एका मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पूढे आली आहे. अंकन डे असे या मुलाचे नाव असून, तो पश्चिम बंगालमधील पश्चिमी मिदनापुर जिल्ह्यातील आनंदपुर येथील राहणारा आहे. अंकन हा इयत्ता १०वीत शिकत होता.

गेम खेळत असताना अंकनने बांथरूमचा दरवाजा बंद केला आला आणि प्लास्टिक बॅगने आपला चेहरा झाकला. तो इतक्यावरच थांबला नाही. तर, त्याने नायलॉनच्या रश्शीने स्वत:चा गळा बांधला. त्यामुळे श्वास गुदमरून अंकनचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (१२ ऑगस्ट) घडली.

रम्यान,याच दिवशी डेहराडूनमध्येही अशाच प्रकारची घटना पूढे आली. डेहराडून येथील घाटीमध्ये इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने ब्लू व्हेलच्या नादापाई अशाच प्रकारचे कृत्य केले. मात्र, शाळा व्यवस्थापनाने त्याला वेळीच रोखल्याने पूढील अनर्थ टळला. या घटनेतील दोन्ही विद्यार्थी ऑनलाईने ब्लू व्हेल गेम खेळत होते.

मिदनापुर येथील घटनेतील मृत विद्यार्थ्याचे पालक एचटी डे यांनी प्रसारमध्यमांना माहिती देताना सांगितले की, शनिवारी अंकन जेव्हा घरी आला तेव्हा बराच वेळ कॉम्प्यूटरवर होता. त्याच्या आईने त्याला नाश्ता करण्यास बोलावले तेव्हा, ‘मी पहिल्यांदा अंघोळ करून येतो, मगच नाश्ता करतो’, असे सांगितले. दरम्यान, त्याच्यावर विश्वास ठेऊन आईही तिच्या कामाला गेली. दरम्यान, बराच वेळ झाला तरी, अंकन बाथरूमबाहेर आला नाही. त्यामुळे आम्ही बाथरूमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा, अंकन बाथरूमच्या फरशीवर निपचीत पडला होता. आम्ही त्याला रूग्णालयात तातडीने दाखल केले मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.