नवी दिल्ली: भूतानमधील डोक्लामवरून सुरू झालेला भारत चीन संघर्ष अधिकच तिव्र होताना दिसत आहे. दोन्ही देशांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला असून, दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने आले आहे. दोन्ही देषांच्या सैन्याच्या तुकड्यांमध्ये आता केवळ 100 मिटरचेच अंतर राहिले आहे. सैन्य मागे घेण्यासाठी चीन भारतावर वारंवार दबाव टाकतो आहे. मात्र, चीनच्या दबावाला कोणतीही भिक न घालता भारताने सैन्य मागे घ्यायला ठाम नकार दिला आहे. त्यामुळे दोन्ही दैशांचे सैन्य आमनेसामने आले असून, भारत आणि चीनचे प्रत्येकी 60 ते 70 जवान सीमेवर तैनात आहेत.

भूतामधील डोक्लाम भागावर चीनने दावा सांगितला आहे. तसेच, या भागातून भारताने सैन्य मागे घ्यावे असा दबाव चीन भारतावर टाकत आहे. मात्र, भूतानच्या भूभागावरून भारताने आक्रमक भूमिका घेत सैन्य मागे घेण्यात भारताने ठाम नकार दर्षवला आहे. यापूर्वीही 1986 मध्ये भारत चीन सैन्य आमनेसामने आले होते. तेव्हा सुंदरम प्रांतावरून दोन्ही देशांमध्ये संघर्ष झाला होता. तेव्हाही दोन्ही देशांचे सैन्य दीर्घकाळापर्यंत आमनेसामने होते. (हेही वाचा, भारत ‘मिनी युद्धा’साठी  सज्ज ! शस्त्र खरेदीचे अधिकार लष्कराला देणार)

दरम्यान, याच महिन्यात चानमद्ये ब्रिक्स देशांची एक परिषद पार पडत आहे. या परिषदेला भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित राहणार आहेत. ब्रिक्स परिषदेसाठी डोवाल २६ जुलैला चीनला जातील. यावेळी ते चीनच्या सुरक्षा सल्लागारांची भेट घेणार आहेत. भारत आणि चीनमधील तणाव कमी होण्याची शक्यता नसल्याने दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीत काय तोडगा निघतो याकडे दोन्ही देशांतील नागरिकाचे लक्ष लागले आहे.