संपूर्ण राज्यात भीषण दुष्काळी परीस्थिती असून आज आपण पाण्याची बचत केली नाही तर भविष्यात ही स्थिती अधिक भयावह होऊ शकते. याचा विचार करून फुलोरा फाउंडेशनने यंदा बिनपाण्याची रंगपंचमी अंधेरी जवळील रस्त्यावर राहत असलेल्या गरीब चिमुकल्यांन सोबत मोठ्या उत्साहात साजरी केली. मुंबईला लाभलेल्या भव्य सागरी किनाऱ्या जवळील जुहु बीच येथे ही बिनपाण्याची रंगपंचमी मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

Children celebrating holi at Juhu Beach

गरीब असो वा श्रीमंत सण प्रत्येकाला साजरा करता आला पाहिजे, आणि म्हणूनच या गरीब मुलांच्या आयुष्यात सुखाचे रंग भरण्यासाठी व त्या चिमूकल्यांना ही पाणी बचतीची शिकवण मिळावी म्हणून बिनपाण्याची रंगपंचमी साजरी करण्यात आली. या प्रसंगी फुलोरा फाउंडेशनचे कार्यकारी विश्वस्त अरुण सबनीस उपस्थित होते. एक दमछाक करणाऱ्या रंगपंचमी सत्रानंतर मुलांना अल्पोपहार व पेय देण्यात आले.

त्या ३० चिमुकल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी १२ स्वयंसेवक सतत दक्ष होते, तसेच अल्पोपहारा च्या कागदी प्लेट्स आणि ग्लास मुळे सभोवतालचा परिसर अस्वच्छ होऊ नये म्हणून,मुले आपल्या जवळील प्लेट्स आणि ग्लास कचरा कुंडीत टाकत आहेत कि नाही याची खात्री स्वयंसेवकांनी घेतली एकूणच त्यांच्या आयुष्यातील हा दिवस नक्कीच अविस्मरणीय असेल.