नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या उजव्या पायाचे हाड मोडले असून त्यांच्या पायाला प्लास्टर लावण्यात आले आहे. रविवारी सकाळी सरकारी निवासस्थानातील बागेत फिरत असताना त्यांचा पाय घसरला. सिंह यांना ताबडतोब एम्स रुग्णालयात नेण्यात आले. तपासणी केल्यानंतर त्यांच्या पायाचे हाड मोडल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

त्यानंतर त्यांच्या पायाला प्लास्टर लावण्यात आले नंतर त्यांना घरी सोडण्यात आले. राजनाथसिंह यांच्या कार्यालयातून यासंदर्भातील कोणती बातमी देण्यात आली नाही. पण यांच्या उजव्या पायाचे हाड मोडले असून त्यांच्या पायाला प्लास्टर लावण्यात आल्याचे ट्विट एएनआय वृृत्तसंस्थेने केले आहे.  सिंह यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. अशी माहिती त्यांच्या निकटवर्तियांनी दिली आहे.