जम्मूजवळ नगरोटा येथे दहशतवाद्यांनी लष्करी छावणीवर आज पहाटे ५.३० च्या सुमारास दहशतवाद्यांनी या छावणीवर ग्रेनेडने हल्ला चढवला आणि गोळीबारही केला. या हल्ल्यात दोन सैनिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. या संपूर्ण भागाला घेराव घातला गेला आहे. लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.

हा हल्ला होताच प्रशासनाने नगरोटामधील शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. प्राथमिक माहितीनुसार या छावणीजवळ तीन दहशतवादी दिसले आहेत. नगरोटा शहर जम्मू जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग १ ए च्या जवळ आहे. हा महामार्ग जम्मू शहराला उधमपूरशी जोडतो.