मुंबई – तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एलआयसीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. एलआयसीमध्ये असिस्टंट अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणजेच सहाय्यक प्रशासकीय अधिकारी या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

एलआयसीमध्ये होणारी ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होत असुन यासाठी इच्छुक उमेदवार आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरु शकतात. या भरती प्रकियेसंदर्भातील अधिक माहितीसाठी तुम्ही एलआयसीच्या https://www.licindia.in या अधिकृत वेबसाइटवर भेट देऊ शकता. या भरती प्रक्रियेसंदर्भातील अर्ज भरण्याची तारिख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीये. मात्र, लवकरच यासंदर्भातील माहिती उपलब्ध करुन देण्यात येईल. पाहूयात एलआयसीमध्ये होत असलेल्या भरती प्रक्रियेसंदर्भातील महत्वाची माहिती…

महत्वाची माहिती:

पद – सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (असिस्टंट अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर)

पदांची संख्या – ६५०

एससी कॅटेगरी – ८६

एसटी कॅटेगरी – ४३

ओबीसी कॅटेगरी – १८२

ओपन कॅटेगरी – ३३९

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक

वयोमर्यादा – किमान २१ वर्ष ते ३० वर्ष