नवी दिल्ली: सर्वाधीक जागा मिळवत नगरपंचायत-नगरपरिषद निवडणुकीत सर्वाधीक जागा मिळवत क्रमांक एकचा पक्ष ठरल्याबद्धल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र भाजपचे कौतूक केले आहे. तसेच, महाराष्ट्रातल्या जनतेचे आभारही मानले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीही महाराष्ट्र भाजपचे कौतूक केले असून, महाराष्ट्रातील जनता भाजपच्या पाठीशी असल्याचे म्हटले आहे.

‘गोरगरिब जनता, विकासाच्या राजकरणाचा विजय; जनतेने दाखविलेल्या विश्वासाबद्दल सर्वांचे आभार’, अशा शब्दांत पंतप्रदान मोदींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दाणवे यांचे कौतूक केले आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा अशा दोघांनीही ट्विटरच्या माध्यमातून आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत. विधानसभा, लोकसभा निवडणुकीनंतर तसेच, केंद्र सरकारने नोटबंदीच्या घेतलेल्या महत्वाकांक्षी निर्णयानंतर पहिल्यांदाच भाजपला इतके मोठे यश मिळत आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात सध्या प्रचंड आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान नोटबंदीच्या निर्णयानंतर जनता भाजपला स्विकारते की नाही. तसेच, राज्यातील मराठा मोर्चांच्या पार्श्वभूमिवर राज्यातील राजकारण काय वळणाने जाईल याबाबत उत्सुकता होती. मात्र, अद्यापही जनतेचा भाजपवर विश्वास असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

दरम्यान, आतापर्यंत हाती आलेल्या निकालावरून आतापर्यंत भाजपला सर्वाधिक २२, काँग्रेसला २१, राष्ट्रवादी १९ आणि शिवसेनेला १५ नगरपालिकांची सत्ता मिळाली आहे. याशिवाय २६ ठिकाणी त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. काही जागांचे निकाल येणे अद्याप बाकी आहे. (हेसुद्धा वाचा, नाशिक नगरपंचात निवडणुक: राष्ट्रवादीचे घड्याळ बंद; शिवसेनेचा बाण वर्मी लागला)

दरम्यान, राज्यातील ५५ नगरपालिकांवर मतदारांनी भाजपच्या नगराध्यक्षांना पसंती दिली आहे. भाजपखालोखाल जनतेने शिवसेनेला पसंती दिली असून, शिवसेनेचे २३ नगराध्यक्ष निवडून आले आहेत. तर,  काँग्रेसचे २१, राष्ट्रवादीचे १० तर अन्य पक्षांचे २५ अपक्ष उमेदवार नगराध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. आतापर्यंत नगरपालिकांमधील २, ५०१ जागांवरील निकाल जाहीर झाले असून यामध्ये भाजप आघाडीवर आहे. त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसने ४८२, काँग्रेसने ४०८, शिवसेनेने ४०२ जागांवर विजय मिळवला आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने १२ तर बहुजन समाज पक्षाने ४ जागांवर विजय मिळवला आहे. अन्य पक्षांना ५८३ जागा मिळाल्या आहेत.