जम्मू-काशअमीरमधील नागरोटा येथे लष्कराच्या छावणीवर झालेल्या हल्ल्यानंतर या हल्ल्यातील दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. तसेच या दहशतवाद्यांकडून काही कागदपत्रही जप्त करण्यात आली आहेत. या कागदपत्रांवर अफझल गुरुचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे.

दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांवर “अफजल गुरू शहीद के इंतकाम की एक किस्त…गजवा ए हिंद के फिदायीन!” असा मजकूर लिहिण्यात आला आहे. यावरून अफजल गुरुच्या फाशीचा बदला घेण्यासाठी नागरोटा हल्ला करण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच या दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आलेल्या साहित्यांवरुन ते जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. (हे पण पाहा: नागरोटा येथील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचा जवान शहीद)

जम्मू-काश्मीरमधील नागरोटामध्ये लष्कराच्या छावणीवर झालेल्या हल्ल्यात ७ भारतीय जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा एजन्सींनी तपास करत ५ कॉल्स ट्रेस केले आहेत. या हल्ल्यातील दहशतवाद्यांना सीमेपलिकडून आदेश मिळत असल्याचंही तपासात समोर आलं आहे.